Monday, 21 January 2013

10 वी व 12 वी च्या परीक्षांकरिता अतिविलंब शुल्क भरण्याच्या तारखा जाहीर



      जळगांव, दि. 21 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी - मार्च – 2013 मध्ये आयोजित करण्यात येणा-या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेस प्रविष्ठ होणा-या विदयार्थ्यांच्या अतिविलंब शुल्काचा (रु. 50/- प्रतिदिनी) कालावधी संपल्यानंतर परीक्षा सुरु होण्यापूर्वी 15 दिवस कालावधी पर्यंत रु. 100 /- प्रतिदिनी प्रमाणे विशेष अतिविलंब शुल्कासह आणि हा कालावधी संपल्यानंतरही कोणताही विदयार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये याकरिता खास बाब म्हणून शासन आदेश अथवा न्यायालयीन आदेशानुसार आवेदनपत्र सादर करणे शक्य होण्याकरीता अतिविशेष अतिविलंब शुल्क प्रतिदिनी रु. 200 /- या प्रमाणे आवेदनपत्रे स्विकारण्या करिता कालावधी देण्यात येत आहे.
       माध्यमीक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी) विशेष अतिविलंब शुल्क अंतीम मुदत    दि. 28 जानेवारी, अति विशेष अतिविलंब शुल्क अंतिम मुदत (शासन / न्यायलय ओदश) दि. 1 मार्च 2013 तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. 12 वी) शासन न्यायालयीन आदेश आल्यास अति विशेष अतिविलंब शुल्काची अंतीम मुदत 20 फेब्रुवारी 2013 पर्यंत असल्याचे प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.  

No comments:

Post a Comment