Monday, 21 January 2013

आदिवासी विदयार्थ्यांनी ऑनलाईन शिष्यवृत्तीचे अर्ज 31 जानेवारी पर्यंत भरावेत



        जळगांव, दि. 21 :- महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जमातीच्या विदयार्थ्यांसाठी ई – स्कॉलरशिप ही योजना कार्यान्वित केलेली आहे. या योजनेमुळे शिष्यवृत्तीची रक्कम थेट अनुसूचित जमातीच्या विदयार्थ्यांच्या खात्यात तर शिक्षण फी परीक्षा फी संबंधीत महाविदयालयाच्या खात्यात जमा होणार आहे. जे विदयार्थी ऑनलाईन अर्ज भरतील त्यांनाच मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचा आणि संबंधीत महाविदयालयांना शिक्षण फी व परीक्षा फीचा लाभ देण्यात येणार असून सदरचा अर्ज भरण्याची मुदत 31 जानेवारी पर्यत असल्याचे प्रकल्प अधिकारी एस.जी. दुधाळ यांनी कळविले आहे.
       यापूर्वी विदयार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी http://etribal.maharashtra.gov.in या वेबसाईटवर दि. 15 जानेवारी 2013 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती. सदर मुदतीत दि. 31 जानेवारी 2013 पर्यंत वाढ करण्यात आलेली आहे. विहीत मुदती नंतर कोणताही अर्ज स्विकारला जाणार नाही. शिष्यवृत्ती पात्र विदयार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी संबंधीत महाविदयालयाचे प्राचार्य यांची राहील. तरी ऑनलाईन अर्ज भरतांना इयत्ता 10 वी च्या परीक्षेचा आसान क्रमांक (Seat Number) आणि उत्तीर्ण झाल्याचे वर्ष (Year of Passing) ही माहिती सोबत ठेवणे अत्यावश्यक असल्याचे प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment