चाळीसगांव
दि. 11:- राष्ट्रीय
कृषी विमा योजनेत राज्यातील जास्तीत जास्त शेतक-यांना सहभागी होता यावे आणि योजनेचा
लाभ शेतक-यांना व्हावा यासाठी रब्बी हंगामातील पिकांचा विमा उतरविण्याकरीता या विमा
योजनेस 15 जानेवारी 2013 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ही मुदतवाढ गहू व हरभरा या पिकांसाठी लागू करण्यात आली आहे.
त्यानुसार तालुक्यातील कार्यक्षत्रात
येणा-या शेतक-यांसाठी राष्ट्रीय पिक विमा योजना लागू करण्यांत आलेली असून शेतक-यांना
नैसर्गिक आपत्ती, किड व रोग कारणांमुळे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई देण्याचा
मुख्य उद्देश या राष्ट्रीय पिक योजनेचा आहे.
सन 2012-13 या रब्बी हंगामात
गहू व हरभरा या पिकांची पेरणी करण्यात आलेली आहे. रब्बी हंगामात विमा अधिसुचित क्षेत्रात
वाढविण्यात येत आहे. पुर, चक्रीवादळ, भुस्खलन व गारपीट या स्थानिक आपत्तीमुळे पेरणी
केलेल्या पिकांची कमी उत्पन्न देण्याची शक्यता आहे. त्यामुळे गहू व हरभरा या पिकांचा
पिक विमा काढल्यास शेतक-यांना फायदा होऊ शकतो. तसेच रब्बी हंगामात शेतक-यांनी अतिरिक्त
क्षेत्रासाठी पिक विमा काढल्यास अधिक फायदा होऊ शकतो.
या पिक विमा योजनेचा लाभ
घेण्यासाठी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतक-यांनी सहभागी होऊन गहू व हरबरा या पिकांचा
पिक विमा उतरविण्याबाबत मंडळ स्तरावर मंडळ कृषि अधिकारी व कृषि पर्यवेक्षक व गांवस्तरावर
कृषि सहायक व कृषि सेवक यांच्याशी किंवा गावानजिकच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन
तालुका कृषि अधिकारी श्री. व्ही. एस. शिंदे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****
No comments:
Post a Comment