Saturday, 19 January 2013

प्रजासत्ताक दिनाच्या समारंभास नागरिकांनी उपस्थित राहावे- जिल्हाधिकारी



           जळगांव, दि. 19 :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 63 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त्‍ दिनांक 26 जानेवारी 2013 रोजी ठिक 9-15 वाजता पोलिस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय जळगांव येथे ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमानंतर त्याच ठिकाणी शालेय विदयार्थ्याचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास सर्व स्वातंत्र्य सैनिक, विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, शासकीय अधिकारी व कर्मचारी जळगांव शहरातील  सर्व नागरिक यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ज्ञानेश्वर राजूरकर यांनी केले आहे.
         जळगांव शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना या शासकीय समारंभात भाग घेता यावा यासाठी दिनांक 26 जानेवारी 2013 रोजी सकाळी 8-30 ते 10-00 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभ करण्यात येवू नये. जर एखादया कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 8-30 च्या पूर्वी किंवा 10-00 च्या नंतर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राजूरकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment