मुंबई, दि. 3: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 अन्वये महाराष्ट्र राज्य विधी
सेवा प्राधिकरणाला प्रदान केलेली किंवा नेमून दिलेली कामे पार पाडण्यासाठी राज्य शासनाने 10
व्यक्तींची महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य म्हणून नियुक्ती केली
आहे. या सदस्यांचा कालावधी दि.
27 डिसेंबर 2012 पासून 3 वर्षापर्यंत राहील. सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे.
आर.ए.दादा,
वरिष्ठ काउन्सेल, उच्च न्यायालय मुंबई; श्रीमती
कुमकुम शिरपूरकर, वरिष्ठ काउन्सेल, उच्च न्यायालय, मुंबई; प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग,
मंत्रालय, मुंबई; सचिव, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई; प्रा. श्रीमती वसुधा कामत, कुलगुरु,
श्रीमती ना. दा. ठा. महिला
विद्यापीठ, मुंबई; श्रीमती शमिता बिश्वास, आयएफसी, सदस्य सचिव, महिला आयोग,
मुंबई; कु.साधना पांडे, अधिष्ठाता, विधी शाखा,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद; डॉ. आशा वाजपेयी, अध्यक्ष, सामाजिक
विधी अभ्यासक्रम व मानवी हक्क केंद्र, टाटा समाजविज्ञान संस्था, मुंबई; श्रीमती निर्मला सामंत प्रभावळकर,
वरिष्ठ अधिवक्ता उच्च न्यायालय मुंबई व सामाजिक कार्यकर्त्या व डॉ. हरीष शेट्टी,
मनोविकृती चिकित्सक.
No comments:
Post a Comment