जळगांव, दि. 9 :- राष्ट्रीय कृषि
विमा योजना रब्बी हंगाम 2012-13 मध्ये गहू व हरभरा उत्पादक शेतक-यांनी बॅकेकडे
विमा प्रस्ताव पाठविण्याची मुदत 15 जानेवारी 2013 पर्यंत असून सदरची मुदतवाढ 31
डिसेंबर 2012 नंतर पेरणी झालेल्या क्षेत्रासाठी लागू असेल, अशी माहिती जिल्हा
अधिक्षक कृषि अधिकारी किसन मुळे यांनी दिली आहे.
सदरच्या योजनेची मुदत 31 डिसेंबर 2012
रोजी संपली असून 4 जानेवारी 2013 च्या शासन निर्णयान्वये सदरील योजनेस 15 जानेवारी
2013 पर्यंत मुदत वाढ देण्यात आल्याचे श्री. मुळे यांनी सांगितले. याकरिता बिगर
कर्जदार शेतक-यांनी पिक विमा प्रस्तावावर पिकाची स्थिती चांगली असल्याची नोंद करुन
पेरणीचा दिनांक नमूद केलेले प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
याअंतर्गत गहू (बागायत ), गहू (जिरायत) व हरभरा या पिकांचे
60 टक्के नुकसान झाल्यास विमा संरक्षित रक्कम अनुक्रमे 12 हजार 750, 5 हजार 200 व
13 हजार 400 आहे तर विमा हप्ता दर अनुक्रमे 1.50 , 1.50 व 2 टक्के असल्याची माहिती
श्री. मुळे यांनी दिली असून जिल्हयातील जास्तीत जास्त शेतक-यांनी या योजनेचा लाभ
घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
No comments:
Post a Comment