मुंबई, दि. 2 : मराठी भाषा विभागांतर्गत राज्य मराठी विकास संस्थेच्यावतीने व
सीडॅकच्या सहकार्याने ‘मराठी संकेतस्थळ-स्पर्धा
2013’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी
होण्यासाठी 18 जानेवारी 2013 पर्यत अर्ज करावेत. तसेच शासनाचे विविध विभाग तसेच
विविध विषयांवर संकेतस्थळे निर्माण करणाऱ्या व्यक्ती, संस्था इत्यादींनी या
स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य मराठी विकास संस्थेतर्फे
करण्यात आले आहे.
शासकीय
संकेतस्थळे व इतर संकेतस्थळे या दोन गटांत ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. शासकीय
संकेतस्थळे स्पर्धेसाठी पहिल्या गटाकरिता प्रथम 15,000रुपये, द्वितीय 10,000 रुपये,
तृतीय 5,000 रुपयांचे पुरस्कार तर इतर संकेतस्थळे या दुसऱ्या गटासाठी अनुक्रमे
35,000, 20,000 आणि 15,000 रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत.
स्पर्धेत
सहभागी होण्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेच्या
http://www.rmvs.maharashtra.gov.in/rmvs
या संकेतस्थळावर तसेच http:// www.cdacmumbai.in या सीडॅक,
मुंबई यांच्या संकेतस्थळावर ऑनलाइन प्रवेशपत्रिका उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
संकेतस्थळासाठी
वापरलेली प्रमाणके (स्टॅण्डर्डस्), वापरलेला टंक (फॉण्ट), संकेतस्थळाची तांत्रिक
गुणवत्ता, वापरासंबंधी पुरवलेल्या सोयी, उपयुक्तता, अद्ययावतपणा, वापरकर्त्यांना
सहभागाची सोय (इण्टरॲक्टिव्हनेस), माहितीची मांडणी, भाषेचा दर्जा, माहितीचा संग्रह
इत्यादी निकषांवर तज्ज्ञ परीक्षकांकडून सहभागी संकेतस्थळांचे परीक्षण करण्यात
येणार आहे.
No comments:
Post a Comment