जळगांव, दि. 18 :- जी.डी.सी.ॲड ए व
सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परीक्षा दि. 25 ते 27 मे 2013 या
कालावधीत होणार आहे. सदरच्या परीक्षेच्या आवेदन पत्राची विक्री जिल्हा उपनिबंधक,
सहकारी संस्था, जळगाव यांचे कार्यालयात दि. 21 जानेवारी ते 11 फेब्रुवारी 2013 या
दरम्यान केली जाणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक प्रताप पाडवी यांनी दिली आहे.
तरी जे परिक्षार्थी सदर परिक्षा देवू
इच्छितात अशा परिक्षार्थींनी वरील कालावधीत कार्यालयीन वेळेत सुट्टयांचे दिवस
वगळून जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगांव यांचे कार्यालयाशी संपर्क साधून जी. डी. सी. अँड ए व सहाकारी
गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परिक्षेचे आवेदन पत्र रु. 50 /- चा रोख भरणा
करुन प्राप्त करुन घ्यावेत. व सदरील आवेदन पत्र दिनांक 16 फेबुवारी 2013 पर्यंत
भरुन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगांव , प्रशासकीय इमारत, टप्प क्रमांक 3
पहिला मजला, आकाशवाणी चौकाजवळ, जळगांव येथे जमा करावे. या बाबतीत अधिक माहितीसाठी
दुरध्वनी क्रमांक 0257 / 2239729 अथवा भ्रमणध्वनी क्रमांक 8806869844, 9850739352
किंवा 9405143777 वर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,
जळगांव कार्यालयाकडून करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment