Thursday, 17 January 2013

राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष श्री. मुनाफ हकीम यांचा जिल्हा दौरा



       जळगांव, दि. 17 :-  महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष श्री. मुनाफ हकीम हे दि. 19 जानेवारी 2013 रोजी जळगांव जिल्हा दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे -
      सकाळी 6.50 वा. जळगांव रेल्वे स्थानक येथे आगमन व अजिंठा शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व राखीव, सकाळी 11 वा. अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनासाठी उपस्थिती, दुपारी 2.30 वा. पोलिस भरती पूर्व परिक्षा प्रशिक्षण केंद्रास भेट, दुपारी 3 वा. अल्पसंख्यांकांच्या योजनांबाबत अजिंठा विश्रामगृह येथे जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, आयुक्त (मनपा), शिक्षणाधिकारी यांचे समवेत बैठक, दुपारी 4 वा. जळगांव येथून शासकीय वाहनाने आकोल्याकडे प्रयाण.

No comments:

Post a Comment