चाळीसगांव
दि. 09- चाळीसगांव
एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत महिला व बालविकास विभागाने राजमाता जिजाऊ आरोग्य
व पोषण अभियानांतर्गत कुपोषणमुक्तीसाठी तालुकास्तरीय कार्यशाळा येथील परदेशी बोर्डींग
हॉल येथे आयोजित करण्यांत आली होती.
या
कार्यशाळेचे उद्घाटन आमदार राजीव देशमुख यांच्या हस्ते करण्यांत आले असून अध्यक्ष म्हणून
पंचायत समिती सभापती श्री. विजय झामसिंग जाधव
होते. यावेळी उपसभापती श्रीमती लताताई दौंड,
जि. प. सदस्या श्रीमती वैशालीताई पाटील, सरपंच संघटनेचे अध्यक्ष श्री. किसनराव जोर्वेकर,
पंचायत समिती सदस्य श्री. जगन्नाथ महाजन, गट विकास अधिकारी श्रीमती मालती जाधव, बाल
विकास प्रकल्प अधिकारी (प्रकल्प 1) श्री. गणेश चौधरी, बाल विकास प्रकल्प अधिकारी (प्रकल्प
2) श्रीमती वनिता सोनगत, श्री. प्रमोद पाटील, श्री. शेषराव पाटील, श्री. किशोर पाटील, श्री. दिलीप महाले, श्री. बाजीराव
दौंड आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार
देशमुख म्हणाले की, सदर अभियान 14 नोव्हेंबर,2012 ते 7 एप्रिल,2013 पर्यंत जरी राबविण्यात
येत असले तरी कालावधी महत्त्वाचा न मानता आपण
सर्वांनी सतत कुपोषण मुक्तीसाठी प्रयत्नशील असले पाहिजे. त्याचबरोबर आपली भावी पिढी
आरोग्यसंपन्न व सुदृढ असली पाहिजे ही आपली सर्वांची जबाबदारी समजून तालुका कुपोषण मुक्तीसाठी
सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
सदर
अभियान तळागाळापर्यंत पोहचवून ख-या लाभार्थ्यास लाभ मिळून त्याला कुपोषणमुक्त करावे.
वाडेवस्ती, तांडे, आदिवासी वस्ती इत्यादी भागात कुपोषण मुक्तीसाठी विशेष प्रयत्न करणे
गरजेचे आहे. आरोग्य व बाल विकास या दोन्ही विभागांनी समन्वयाने हे अभियान यशस्वी करावे,
असे आवाहन सभापती विजय जाधव यांनी याप्रसंगी केले.
तसेच
गट विकास अधिकारी श्रीमती मालती जाधव यांनी अभियानासंबंधी सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन
व सुचना उपस्थितांना केल्या.
या
अभियानात 0 ते 6 वयोगटातील बालकांचे वजन व दंडघेर घेणे, नोंदी ठेवणे, किशोरवयीन मुलींचे
बीएमआय व एचबी मोजणे, गरोदर व स्तनदा माता इ. ची काळजी घेणे, कुपोषित बालकांना ग्राम विकास केंद्रात दाखल करणे,
3 वर्षापेक्षा कमी वयातील बालकांची अधिक काळजी घेणे, नवविवाहीत जोडप्यांचे समुपदेशन
करणे तसेच कुपोषण कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे, लोकसहभाग मिळविणे इत्यादी उपक्रमांचे
नियोजन करण्यांत आले आहे, असे बाल विकास प्रकल्प अधिकारी (प्रकल्प 2) डॉ. वनिता सोनगत
यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले.
सदर
कार्यशाळचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन बाल विकास प्रकल्प अधिकारी (प्रकल्प 1) श्री.
गणेश चौधरी यांनी केले. यावेळी सर्व सरपंच, सर्व वैद्यकीय अधिकारी, मुख्यसेविका, ग्रामसेवक
तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
* * * * *
No comments:
Post a Comment