जळगांव, दि. 8 :- जिल्हा नियोजन समिती
( निवडणूक) नियम 1999 चे तरतुदीनुसार जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी
ग्रामीण निर्वाचन क्षेत्र ( जिल्हा परिषद), लहान नागरी निर्वाचन क्षेत्र,
(नगरपालिका क्षेत्र) व मोठे नागरी निर्वाचन क्षेत्र (महानगरपालिका क्षेत्र)
साठीच्या प्रारुप मतदार यादया जिल्हाधिकारी कार्यालय (निवडणुक शाखा), महानगरपालिका
कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय व सर्व नगरपालिका कार्यालयातील सुचना फलकांवर प्रसिध्द
करण्यात आलेल्या आहेत. या यादयांवर हरकती, त्रुटी, चुका असल्यास त्या सादर कराव्यात,
दिनांक 10 जानेवारी 2013 रोजी अंतिम यादी
प्रसिध्द करण्यात यईल असे ज्ञानेश्वर राजूरकर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक
अधिकारी , जळगांव यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment