नाशिक - प्रत्येक महिन्याच्या
दुसऱ्या सोमवारी होणाऱ्या
विभागीय
लोकशाही
दिनाचे
आयोजन
सोमवार
दिनांक
14
जानेवारी, 2013 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय,
नाशिक
रोड,
नाशिक
येथे
सकाळी
11.00
वाजता करण्यात
आले आहे.
शासन परिपत्रक क्र. प्रसुधा 2011/प्र.क्र.189/11/18-अ, दि.26 सप्टेंबर, 2012 च्या शासन परिपत्रकानुसार आता तालुका स्तरावरसुद्धा प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी (या दिवशी सुट्टी असल्यास त्यानंतर येणारा कामकाजाचा दिवस) लोकशाही दिनाचे आयोजन करण्याबाबत निर्णय घेतलेला आहे.
तसेच, विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त कार्यालयात होणा-या (प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी) विभागीय लोकशाही दिनात, दि. 26 सप्टेंबर, 2012 रोजीच्या परिपत्रकात ठरवून दिलेल्या निर्देशानुसार अर्जदार यांनी खालील विहीत नमुन्यात अर्ज सादर करावयाचा आहे.
प्रपत्रर 1(क)
1
|
अर्जदाराचे नाव व पूर्ण पत्ता
|
:
|
|
2
|
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक
|
:
|
|
3
|
विषय
|
:
|
|
4
|
तालुका लोकशाही दिनात अर्ज केला होता काय?
|
:
|
|
5
|
असल्यास, टोकन क्रमांक
|
:
|
|
6
|
जिल्हाधिकारी / महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनात अर्ज सादर केला होता काय?
|
:
|
|
7
|
असल्यास, टोकन क्रमांक
|
:
|
|
8
|
तहसिलदारांकडून मिळालेले उत्तर
|
:
|
|
9
|
जिल्हाधिका-यांकडून / महानगरपालिका आयुक्तांकडून मिळालेले उतर
|
:
|
दिनांक अर्जदाराची सही
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे :-
1)
विभागीय आयुक्त यांना उद्देशून अर्ज,
2)
तालुका लोकशाही दिन टोकन क्रमांक प्रत,
3)
तहसिलदारांच्या उत्तराची प्रत,
4)
जिल्हाधिकारी / महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिन
टोकन क्रमांक प्रत,
5)
जिल्हाधिकारी / महानगरपालिका आयुक्तांच्या उत्तराची प्रत.
अर्जदारांकरिता सर्वसाधारण सूचना-
1.
लोकशाही दिन विभागीय आयुक्त कार्यालयात होईल त्यावेळी मुऴ अर्जासह उपस्थित रहावे.
2.
वरील नमुन्यात अर्ज त्यासोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या 15 (पंधरा) दिवस आधी पाठविणे आवश्यक आहे.
3.
वरील बाबींची पुर्तता केली नाही तर लोकशाही दिनांत प्रत्यक्ष अर्ज सादर करता येणार नाही.; असे निर्देश देण्यात आलेले आहेत. सदर बाबींची पुर्तता केली नाही तर लोकशाही दिनात प्रत्यक्ष अर्ज सादर करता येणार नाही.
खालील विषयांवरील अर्ज लोकशाही दिनांत स्विकारले जाणार नाहीत.
1)
न्यायप्रविष्ठ प्रकरणे
2)
राजस्व / अपिल्स
3)
सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी
4)
विहीत नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांची प्रती न जोडलेले अर्ज
5)
अंतिम उत्तर दिलेले आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज
6)
तक्रार / निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर
7)
वरीलप्रमाणे जे अर्ज लोकशाही दिनाकरिता स्विकृत करता येऊ शकणार नाहीत असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी आठ दिवसात पाठविण्यात येतील व त्याची प्रत अर्जदारास पृष्ठांकीत करण्यात येईल.
विभागीय लोकशाही दिनात निवेदन स्विकारतांना त्यासंबधीची तक्रार जिल्हास्तरीय लोकशाही दिनात मांडण्यांत आली होती व त्यावरील कार्यवाहीबाबत अर्जदार समाधानी नाही हे तपासून घेण्यांत येईल. जिल्हास्तरीय लोकशाही दिनी तक्रार केल्यानंतर किमान दोन महिन्यांनंतर विभागीय स्तरावरील लोकशाही दिनी तक्रार करता येईल. ज्या निवेदनकर्त्याने जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये दिलेल्या निवेदनाची प्रत व टोकन क्रमांक सादर केला नाही त्याचा अर्ज विभागीय लोकशाही दिनात स्विकारला जाणार नाही. विभागीय स्तरावरील लोकशाही दिनी तक्रार केल्यानंतर टोकन क्रमांकाच्या प्रतीसह अर्जदारास किमान दोन महिन्यांनंतर मंत्रालय लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करता येईल.
नागरिकांना याद्वारे असेही आवाहन करण्यांत येते की, विभागीय लोकशाही दिनी निवेदने स्विकारल्यानंतर अर्जदाराची मागणी समजावून घेवुन त्याबाबत शासानची भूमिका, तरतूद याविषयी मार्गदर्शन करण्यांत येते. तथापि काही वेळा निवेदनकर्ते त्यांचे तक्रारीबाबत भावानप्रधान होऊन तक्रारीचे निराकरण याच स्तरावर होणेबाबत हेका धरतात व त्याचा सातत्याने पाठपुरावा करतात त्यामुळे ज्या बाबींचे निराकरण या स्तरावर होणे शक्य नाही अशा तक्रारी लोकशाही दिनामध्ये अडचणी सादर करण्यापुर्वी त्यांची तक्रार कोणत्या स्वरुपाची आहे, ती शासकीय नियमांत बसते काय हे समजुन घेणे आवश्यक आहे. अडचणीचे निराकरण करणेसाठी व न्याय मागण्यासाठी दिवाणी न्यायालये, मानवी हक्क आयोग, लोकआयुक्त कार्यालय तसेच संबधीत विषयांसाठी अस्तीत्वात असलेल्या प्रशासकीय यंत्रणा हे मार्ग देखील उपलब्ध आहेत. जी कामे नियमानुसार मान्य होण्यासारखी नाहीत, त्याबाबत तक्रारदारांनी कायदेशीर तरतूदी समजावून घ्याव्यात व विभागीय लोकशाही दिनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त नाशिक यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment