जळगांव, दि. 5 :- महात्मा
गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये समावेश करण्यात आलेल्या कामांची
माहिती सर्वसामान्य लोकांपर्यत पोहोचावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत
घडीपुस्तिका तयार करण्यात आली आहे. सदरच्या पुस्तिकेचे विमोचन पालकमंत्री ना.
गुलाबराव देवकर यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात
संपन्न झाले.
यावेळी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, मुख्य
कार्यकारी अधिकारी शीतल उगले, उपजिल्हाधिकारी (रोहयो) जितेंद्र वाघ, प्रांताधिकारी
रविंद्र राजपूत, मा. सभापती बळीराम सोनवणे, पंचायत समिती सभापती दिलीप कोळी,
उपसभापती विजय नारखेडे, तहसिलदार कैलास देवरे आदि उपस्थित होते.
सदरच्या पुस्तिकेत महात्मा गांधी नरेगा योजनेची
पार्श्वभूमी, वैशिष्टये, सोयी – सुविधा, योजनेतर्गत जबाबदारी, योजनेतंर्गत
करावयाची विविध कामे आदि विषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. तसेच योजनेतील
कामाचे गुण व नियंत्रण दक्षता आणि योजने विषयी अधिक माहितीसाठी जिल्हास्तरीय व
तालुकास्तरावरील राजकीय यंत्रणेचे संपर्क क्रमांक देण्यात आलेले आहेत.
No comments:
Post a Comment