चाळीसगांव
दि. 10- विकास
आयुक्त (हातमाग) वस्त्र मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली तसेच वस्त्रोद्योग विभाग महाराष्ट्र
शासन प्रयोजित महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्या.नागपूर इंद्रायणी हॅन्डलुम आयोजित
जिल्हास्तरीय हातमाग प्रदर्शन चाळीसगांव येथे अग्रवाल बिर्ल्डींग ग्राऊंड हॉल, डाग बंगल्यासमोर, स्टेशन रोड येथे
सुरु असून नागरिकांचा उत्तम प्रतिसाद या प्रदर्शनाला मिळत आहे.
हातमाग प्रदर्शनात खास संक्रातीसाठी
अस्सल हातमागाच्या विणकरी कलाकुसरीने तयार केलेल्या साडया खरेदी करण्यासाठी महिलांची
झुंबड उडत आहे. तसेच नैसर्गिक धाग्यापासून तयार केलेल्या रेशमी सिल्क साडया, चादरी,
टॉवेल, पंचे, गांधी टोपी, खादी कापड, रेडीमेड शर्ट इत्यादी उपलब्ध असून सर्व प्रकारच्या
कापडांवर ग्राहकांना 20 टक्के सुट देण्यात येत आहे.
हातमाग प्रदर्शनाद्वारे पाहण्याची व खरेदी करण्याची संधी शासनाने शहरात
उपलब्ध करुन दिलेली आहे. या प्रदर्शनाची वेळ सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत आहे.
हे प्रदर्शन दि. 13 जानेवारी,2013 पर्यंतच राहणार असून हातमाग प्रदर्शन ग्रामीण विणकर
कारागिरांच्या रोजगार प्राप्तीचा उद्देश साध्य होणार असल्याने हातमाग कापड खरेदी करुन
शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या संधीचा फायदा शहरातील नागरीकांनी मोठया प्रमाणात घ्यावा,
असे आवाहन प्रदर्शन प्रमुख श्री. ज्ञानदेव बाभुळकर यांनी केले आहे.
हातमाग प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र शासनाच्या
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे नियमित
प्रसिध्द होणारे लोकराज्य या मासिकाचा स्टॉलही येथील उप माहिती कार्यालयाने लावलेला आहे. सदर स्टॉल
लोकराज्य अंक विक्री तसेच वार्षिक वर्गणी रु. 100/- भरुन नवीन वर्गणीदार
होण्यासाठी उपलब्ध करुन दिलेला आहे. या लोकराज्य मासिकात शिक्षण, उद्योग, व्यवसाय, आरोग्य, कृषि, रस्ते विकास, वन, सामाजिक वनीकरण, पर्यावरणाचे रक्षण, शासनाच्या विविध विकास योजनांची माहिती, शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा सदर, मान्यवर व्यक्तींच्या मुलाखती, लेख आदि उपयुक्त माहिती प्रसिध्द होते. या लोकराज्य मासिकाचा मोठया प्रमाणात वार्षिक वर्गणीदार होण्याचे आवाहन उप माहिती
कार्यालयातर्फे करण्यांत आले आहे.
* * * * *
No comments:
Post a Comment