मुंबई,
दि. 4 : राज्य शासनाचा क्रीडा विभाग आणि मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने
12 जानेवारी 2013 ते 19 जानेवारी 2013 या कालावधीत राष्ट्रीय युवादिन व युवा
सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 15 ते 35 वर्षे वयोगटातील युवकांना
सहभागी होता येणार आहे. यात सहभागी होण्यासाठी प्रवेशिका जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालय, मल्होत्रा हाऊस, तिसरा मजला, जी. पी. ओ समोर, वालचंद हिराचंद मार्ग,
बोरीबंदर, मुंबई, येथे 10 जानेवारी 2013 पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन जिल्हा
क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे.
या युवा सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
येणार आहे. यामध्ये दिनांक 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद शिकवण व तत्वज्ञान,
दिनांक 13 जानेवारी रोजी राष्ट्रीय विचारसरणीवर सामुदायिक गीत गायन, दिनांक 14
जानेवारी रोजी समाजसेवा दिनी युवकांच्या निबंध व चित्रकला स्पर्धा, दिनांक 15
जानेवारी रोजी शारीरिक क्षमता दिनी
राष्ट्रीय सेवा योजना- प्रशिक्षित विद्यार्थ्यांच्या सहकार्याने समाजसेवा कार्य,
दिनांक 16 जानेवारी रोजी शांततेसाठी युवक
दिन जिल्हा क्रीडा स्पर्धा, दिनांक 17 जानेवारी
रोजी सुट्टीच्या कालावधीत शिक्षण घेतलेल्या युवकांच्या कलागुणांचे प्रदर्शन,
दिनांक 18 जानेवारी रोजी वादविवाद स्पर्धा, मेळावा, उद्देश, शांततेसाठी युवक दिनास
योग्य असे खेळ, दिनांक 19 जानेवारी रोजी युवकांसाठी भाषण व युवक सप्ताहानिमित्त
झालेल्या कार्यक्रमाचा आढावा व बक्षीस समारंभ, असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले
आहेत.
कार्यक्रम म्हाडा कॉलनी, हॉटेल मराठा समोर बि.न.टी-64-63
च्या मागे टाटा पावर हाऊस शेजारी, अल्मेडा कम्पाउण्ड, प्रतीक्षानगर या ठिकाणी
होणार आहेत.
No comments:
Post a Comment