जळगांव,दि. 24 :- बोदवड येथील शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत मागेल
त्याला व्यवसाय प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत अनुसुचित जाती ( एससी) उमेदवारांसाठी
व्यावसायीक प्रशिक्षण देणेबाबत सन 2012-13 करीता अल्पमुदतीचे अभ्यासक्रम 30
उमेदवाराकरिता सुरु केला जाणार आहे. तसेच रोजगारभिमुख प्रशिक्षण योजना या
योजनेअतर्गत सन 2012 – 13 करीता मुस्लीम, ख्रिश्चन, पारशी, बौध्द, जैन या
अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी अल्पमुदतीचे अभ्यासक्रम त्वरीत सुरु करावयाचे आहे. सदर
अभ्यासक्रमासाठी 35 अल्पसंख्यांक उमेदवार पाहिजे आहे. सदर उमेदवारांना प्रशिक्षण
पूर्ण केल्यानंतर संस्थेकडून टूलकिट व विदयावेतन देय राहिल. व सदर अभ्यासक्रमाची
परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तरी
वरील अभ्यासक्रमासाठी उमेदवारांनी मा. प्राचार्य , औदयोगिक प्रशिक्षण संस्था बोदवड
जि. जळगांव यांचे अर्ज करुन कार्यालयास
सादर करावे. अधिक माहितीसाठी प्राचार्याशी संपर्क साधावा असे प्राचार्य औदयोगिक
प्रशिक्षण संस्था ओदवड जि. जळगांव यांनी केले आहे .
No comments:
Post a Comment