जळगांव, दि. 24 :- राजीवगांधी जीवनदायी आरोग्य योजना या महत्वाकांक्षी
योजनेची अंमलबजावणी जळगांव जिल्हयांमध्ये दि. 2 जुलै पासून सुरु झालेली आहे या
योजनेची अंमलबजावणी राज्यातील उर्वरीत जिल्हयामध्ये नजिकच्या काळात राबविण्यात येणार
आहे. या संदर्भात जिल्हयातील सर्व 30 खाटांच्या वरील शासकीय व खाजगी रुग्णालयांना
समाविष्ट करुन घेण्यासाठी एक दिवसाची कार्यशाळा दि. 30 जानेवारी रोजी आय.एम.ए.
(इंडियन मेडीकल असोसीयशन) हॉल जळगांव येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
या
कार्यशाळेत राजीव गांधी सोसायटीतील अधिकारी योजनेसंदर्भात मार्गदर्शन करतील तरी
जिल्हयातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी कार्यशाळेस उपस्थित रहावे
असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना यांनी एका
पत्रकाव्दारे केले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. चव्हाण जितेंद्र – 09664412221 जळगांव
जिल्हा समन्वयक, राजीवगांधी जीवनदायी आरोग्य योजना, यांचेशी संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment