जळगांव,
दि. 8 :- जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, जळगांव
कार्यालयाचे वतीने दि. 11 जानेवारी 2013 रोजी सकाळी 10.00 वाजता, शासकीय औदयोगिक
प्रशिक्षण संस्था – मुलांचे येथील मेस हॉल, नॅशनल हायवे क्र. 6, जिल्हा उदयोग
केंद्राजवळ, जळगांव येथे रोजगार मेळावा, आयोजित करण्यांत आलेला आहे. या
मेळाव्यासाठी खाजगी आस्थापनांनी त्यांचेकडील एकूण 500 रिक्तपदांची मागणी केली
असल्याची माहिती सहाय्यक संचालक प्रकाश सोनवणे यांनी दिली आहे. यामध्ये टोल ऑपरेटर 200 पदे, टोल सुपरवायझर 200
पदे व टोल ॲड टोल ऑडीटर 100 पदे असून त्याकरिता अनुक्रमे 10 वी, 12 वी / पदवी व
पदवीधर संगणक शैक्षणिक अर्हता आहे तरी
सदरच्या रोजगार मेळाव्यास इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहावे.
No comments:
Post a Comment