Friday, 4 January 2013

“ब” वर्ग तीर्थक्षेत्राच्या अनुदानात एक कोटी रुपयांनी वाढ -- जयंत पाटील



         मुंबई, दि. 4 : राज्यातील वर्ग तीर्थक्षेत्रांच्या अनुदानात एक कोटी रुपयांहून वाढ करून हा निधी 2 कोटी रुपये इतका करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
            ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील , , , वर्ग तीर्थक्षेत्रांचा समावेश होत असल्याचे सांगून श्री. पाटील म्हणाले, राज्यातील विविध तीर्थक्षेत्रांचा विकास करून त्याठिकाणी भाविकांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेची अंमलबजावणी केली जाते. योजनेअंतर्गत हा निधी संबंधित तीर्थक्षेत्रास एकरकमी किंवा टप्प्या टप्प्यात उपलब्ध करून देण्यात येतो. तीर्थक्षेत्र विकासासाठी 2012-13 या आर्थिक वर्षात राज्य स्तरावर 32 कोटी 30 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. 
या निधीतून मुख्य रस्त्यापासून तीर्थक्षेत्र यात्रास्थळापर्यंतचे रस्ते, पोहोच रस्त्यावरील पथदिवे, मंदिर परिसरात संरक्षक भिंतीचे बांधकाम, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बांधणे, तीर्थक्षेत्राच्या जवळ नदी किंवा ओढा असेल तर त्या नदी किंवा ओढ्यावर संरक्षण भिंत बांधणे, स्त्री-पुरुष शौचालये-स्नानगृहे बांधणे, स्त्री-पुरुष भाविकांच्या निवासासाठी भक्त निवास बांधणे, तीर्थक्षेत्राचा परिसर सुशोभित आणि स्वच्छ राहावा यादृष्टीकोनातून सौंदर्यीकरणाची, पेवरब्लॉक्सच्या वाहनतळाची कामे आदी कामे करता येतात.

No comments:

Post a Comment