चाळीसगांव दि. 04- चाळीसगांव एकात्मिक बाल विकास
सेवा योजना (प्रकल्प 1 व 2) अंतर्गत राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
जाणीव जागृती अभियान कार्यक्रम पंचायत समिती सभागृहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती श्री. विजय झामसिंग जाधव यांच्या हस्ते करण्यांत आले. यावेळी
पंचायत समिती सदस्य, गट विकास अधिकारी श्रीमती मालती जाधव, तहसिलदार श्री. शशिकांत
हदगल, पोलीस निरीक्षक श्री. लक्ष्मणराव गायकवाड, बाल विकास प्रकल्प अधिकारी (प्रकल्प
1) श्री. गणेश चौधरी, बाल विकास प्रकल्प अधिकारी (प्रकल्प 2) श्रीमती वनिता सोनगत आदी
मान्यवर उपस्थित होते.
राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जाणीव जागृती
अभियान तालुका पातळीवर व गावस्तरावर विविध उपक्रमांद्वारे मोठया प्रमाणात राबवून यशस्वी
करावे असे आवाहन सभापती विजय जाधव यांनी याप्रसंगी केले.
सदर अभियान 12 जानेवारी 2013 पर्यंत राबविण्यात
येत असून या अभियानामध्ये तालुका पातळीवर व गाव स्तरावर विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात
आलेले आहे. यामध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी करणे, महिला अत्याचार, महिला व बालकांविषयी
चर्चा व योजना, महाविद्यालयातील मुलीची छेडछाड, लैंगीक अत्याचार विरोधी चळवळ निर्माण
करणे, कौटुंबिक कलह विषयावर चर्चासत्र, आहार
व आरोग्य मार्गदर्शन, बाल विवाह प्रतिबंध कायदा व त्याचे दुष्परिणाम थांबविण्यासाठी
उपाययोजना करणे, मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व
पटवून देणे, हुंडा प्रतिबंध कायदा तरतुदीबाबत चर्चासत्र, स्त्रीभुण हत्या रोखण्यासाठी
जनजागृती करणे, समाज प्रबोधन, कुपोषणाबाबतचे समज-गैरसमज, आहार व आरोग्य विषयक घ्यावयाची
काळजी, कुपोषण निर्मुलनासाठीचे उपक्रम, स्तनपानाचे महत्त्व, बाळाला आहारात द्यावयाच्या
पध्दती, घरातील उपलब्ध धान्य वापरण्याचे पध्दती, किशोरी मुलींचे सक्षमीकरण, सबला योजना
इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.
या अभियानात सर्वांनी
सहभागी होऊन अभियान यशस्वी करावे,असे आवाहन महिला व बाल विकास विभागातर्फे करण्यांत
आले आहे.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती सुनिता चव्हाण यांनी केले
असून या कार्यक्रमाला सर्व मुख्य सेविका तसेच कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment