जळगांव,
दिनांक 20:- जिल्हयातील जास्तीत जास्त बालकांना राष्ट्रीय पल्स पोलिओ
मोहिमेअंतर्गत पोलिओ डोसेस देऊन सदरची मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन पालकमंत्री ना.
गुलाबराव देवकर यांनी केले.
जिल्हा
सामान्य रुग्णालयात आज सकाळी 8 वाजता ना. देवकर यांनी कु. विधान देवकर या बालकास
पोलिओ डोस देऊन सदरच्या मोहिमेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी
सोमनाथ गुंजाळ, अतिरिक्त पोलिस अधिक्षक रुपसिंग तडवी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.
एस.एन. लाळीकर, डॉ. बडगुजर आदि उपस्थित होते.
ना.
देवकर म्हणाले सदरच्या मोहिमेंतर्गत 1995 पासून जिल्हयासह देशभरात पोलिओ डोसेस
बालकांना दिले जातात. त्यामुळे शारिरीक अपंगत्वाचे प्रमाण कमी झाले असून भारतातून
जवळपास पालिओचे निर्मुलन झाले असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात आपल्या बालकांना पोलिओची लागण होऊ नये
म्हणून दि. 20 जानेवारी व पुढे 23 फेब्रुवारी 2013 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पल्स
पोलिओ लसीकरण मोहिमेत जिल्हयातील सर्व नागरिकांनी आपल्या पाल्यांना/ बालकांना
पोलिओ डोसेस देण्याचे आवाहन ना. देवकर यांनी केले.
जिल्हयातील
सुमारे 4 लाखापेक्षा अधिक बालकांना पोलिओ डोसेस सदरच्या मोहिमेतून देण्यात येणार
असल्याची माहिती डॉ. एस.एन. लाळीकर यांनी दिली.
No comments:
Post a Comment