जळगांव, दि. 17 :- अनुसूचित जाती व नवबौध्द
घटकातील शेतका-यांसाठी असलेली पॉवर टिलर पुरवठा करण्याची योजना बंद करण्यात आली
असून त्याऐवजी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना
ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तरी जळगांव
जिल्हयातील बचत गटांनी आपले प्रस्ताव दि. 24 जानेवारी 2013 पर्यंत पाठविण्याचे
आवाहन सहाय्यक आयुक्त व्ही.ए.पाटील यांनी केले आहे.
सामाजीक
न्याय विशेष सहाय्य विभागाच्या दि. 6 डिसेंबर 2012 च्या शासन निर्णयान्वये अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील
शेतक-यासांठी असलेली पॉवर टिलर पुरवठा योजना बंद करण्यात आली त्याऐवजी सदरच्या
घटकातील स्वयंसहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी
ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटयोव्हेटर व ट्रेलर याचा पुरवठा
करण्यात येणार आहे.
सदरच्या योजनेच्या अटी व शर्तीपुढील प्रमाणे आहेत.
1)अनु. जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांतील सदस्य महाराष्ट्र राज्याचे रहिवासी
असावेत.
2) स्वंय्यता बचत गटांतील किमान 80 टक्के सदस्य हे अनु. जाती व
नवबौघ्द घटकांतील असावेत 3) मिनी टॅक्टर व
त्याची उपसाधने याच्या खरेदीची कमाल मर्यादा 3 लाख 50 हजार इतकी राहील. स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रकमेच्या 10
टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर 90 टक्के (कमाल 3 लाख 15 हजार) शासकीय अनुदान अनुज्ञेय
राहील. 4) अटी व र्श्तीमध्ये जे बचत गट पात्र असतील अशा बचत गटांनी बचत गट नोंदणी
प्रमाणपत्र बॅक पासबुक, घटनाप्रत, सदस्य यादी मागील 2 वर्षाचा ऑडीट रिपोर्ट
यांच्या साक्षांकित केलेल्या झेरॉक्स प्रती सोबत जोडाव्यात आपल्या संस्थेच्या लेटर
पॅडवर किंवा को-या कागदावर आपला प्रस्ताव दिनांक 24 जानेवारी 2013 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण जळगांव मायादेवी
मंदिरासमोर, महाबळ रोड जळगांव यांचे कार्यालयात सादर करावा 24 तारखेनंतरचे प्राप्त
होणार प्रस्ताव अपात्र ठरविण्यात येतील. सदरचा शासन निर्णय www.mahrashtra.gov.in या संकेतस्थाळावर उपलब्ध आहे.
No comments:
Post a Comment