Monday, 21 January 2013

जिल्हा ग्राहक मंच अध्यक्ष व राज्य तक्रार निवारण सदस्य पदांच्या अर्जाची उपलब्धता



           जळगांव, दि. 21 :- महाराष्ट्र राज्यातील जिल्हा ग्राहक मंचामध्ये मा.अध्यक्ष या पदासाठी कार्यरत अथवा सेवा निवृत्त जिल्हा न्यायाधीशांकडून तर राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्य (नॉन ज्युडिशियल) पदांच्या नियुक्तीकरिता आवश्यक अर्ज   दि. 25 जानेवारी 2013 पर्यंत जिल्हा तक्रार निवारण न्याय मंच जळगांव येथून घेऊन जाण्याचे आवाहन जिल्हा तक्रार निवारण न्याय मंच कार्यालयाकडून करण्यात येत आहे.
       सदरच्या पदांकरिता इच्छूक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता व अनुभव नमूद केल्यास व अर्जाचे शुल्क शंभर रुपये भरल्यास दि. 25 जानेवारी पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा तक्रार निवारण न्याय मंच कार्यालयात अर्ज उपलब्ध असल्याचे तक्रार निवारण कार्यालयाकडून कळविण्यात येत आहे.  

No comments:

Post a Comment