Monday, 14 January 2013

108 व्या विभागीय लोकशाही दिनात 14 तक्रारी दाखल

            नाशिक दि.14: - 108 व्या विभागीय लोकशाही दिनात आज 14 तक्रारी दाखल झाल्या. अपर आयुक्त, श्री. टि. के. बागुल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या लोकशाही दिनात महसूल, सहकार, महानगरपालिका इत्यादी विभागांशी या तक्रारी संबंधित आहेत. आतापर्यंत दाखल झालेल्या 773 तक्रारींपैकी 676 तक्रारी निकाली काढल्या आहेत. तथापि, अद्यापही 97 तक्रारी प्रलंबित आहेत. या प्रलंबित प्रकरणांचाही तातडीने निपटारा करावा, अशा सुचना अपर आयुक्तांनी संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या. या लोकशाही दिनात सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment