Friday, 18 January 2013

विदयार्थ्यांचे बॅक खाते असल्याशिवाय शिष्यवृत्तीचे प्रस्ताव व बिले स्वीकारली जाणार नाही



          जळगांव, दि. 18 :- जिल्हयातील सर्व प्राथमिक व माध्यमिक विदयालय तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक यांनी  जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद जळगांव या विभागामार्फत दिल्याजाणा-या सर्व शिष्यवृत्ती, गुणवत्ता, परिक्षा फी, अपंग शिष्यवृत्ती, अस्वच्छ शिष्यवृत्ती तसेच दारिद्रय रेषेखालील विदयार्थ्यांना शिक्षण शुल्काची रक्कम ही RTGS कायदयानुसार विदयार्थ्याच्या खात्यावर रक्कम जमा करणे बंधन कारक असल्याचे समाज कल्याण अधिकारी राकेश महाजन यांनी कळविले आहे.
         सदरच्या सर्व मुख्याध्यापक यांनी वैयक्तीक लक्ष घालुन आपले विदयालयातील सर्व विदयार्थ्याचे त्वरीत बॅक खाते उघडून शाळेच्या खात्यावर जमा करण्याची जबाबदारी ही मुख्याध्यापकांची असल्याने सन 2013 – 14 या शैक्षणिक वर्षामध्ये होणा-या कॅम्प मध्ये विदयार्थ्याचे बिलामध्ये खाते क्रमांक असल्या शिवाय शिष्यवृत्तीचे प्रस्ताव व बिले स्विकारले जाणार नाहीत तरी जिल्हयातील सर्व मुख्याध्यापकांनी विदयार्थ्यांचे बॅक खाते उघडण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या  समाज कल्याण विभागाकडून करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment