Sunday, 6 January 2013

पत्रकार दिनानिमीत्त चाळीसगांव येथे पत्रकारांना लोकराज्य भेट



          चाळीसगांव दि. 06-  पत्रकार दिनाचे औचित्य साधून कै. वनजीबाबा ग्रामीण विकास मंडळ संचलित, अध्यापक विद्यालय, चाळीसगांव यांच्या मार्फत चाळीसगांव तालुक्यातील पत्रकारांना लोकराज्य अंक भेट देण्यात आला. यासाठी संस्थेचे अध्यक्ष उन्मेश पाटील यांनी रु.5 हजाराचा धनादेश नाशिक विभागाचे  उपसंचालक देवेंद्र भुजबळ यांच्याकडे सुपुर्द केला. या रकमेतुन चाळीसगांव येथील पत्रकारांना वर्षभर लोकराज्य मासिकाचा अंक घरपोच भेट मिळेल. ज्येष्ठ विधीतज्ञ तथा विशेष सरकारी वकील ॲड.निर्मलकुमार सुर्यवंशी, चाळीसगांव येथील पत्रकार तसेच संस्थेचे विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते.
            यावेळी बोलतांना ॲड. सुर्यवंशी यांनी पत्रकारांनी कायद्याचे ज्ञान आत्मसात करणे हे कसे गरजेचे आहे याविषयी विवेचन केले तर माहिती उपसंचालक देवेंद्र भुजबळ यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेविषयी माहिती देऊन त्यांचे जीवन व पत्रकारिता आजही  दिशादर्शक आहे असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे अध्यक्ष श्री उन्मेश पाटील यांनी केले तर आभारप्रदर्शन चाळीसगांव पत्रकार संघाचे  श्री. राजेंद्र पाटील यांनी मानले.
      
*  *  *  *  *

No comments:

Post a Comment