Tuesday, 8 January 2013

महिला व बालकांसाठी असणा-या कायदयांची माहिती जाणीव जागृती अभियानातून देणार



         जळगांव, दि. 8 :- राज्यातील दुर्बल व गरजू घटक पुढे यावेत आणि महिला व बालकांसाठी असणा-या सामाजिक कायदयांची माहिती प्रत्येक घरात पोहचविण्यासाठी दि. 3 जानेवारी 2013 ते 12 जानेवारी 2013 या कालावधीत राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जाणीव – जागृती अभियान जिल्हास्तर / प्रकल्पस्तर / अंगणवाडी स्तरावर राबविण्यात येत आहे. सदर अभियान कालावधीत चर्चासत्र, पथनाटय, रॅली, एकांकिका, स्पर्धा, प्रशिक्षण शिबीर, कठपुतली शो या सारख्या कार्यक्रमाचा समावेश असणार आहे, अशी माहिती विभागीय उपआयुक्त महिला व बाल विकास विभाग नाशिक यांनी दिली आहे.       

No comments:

Post a Comment