जळगांव, दि.3 :- सन 2013 मध्ये होणा-या JEE-MAIN / JEE-ADVANCED या परीक्षेच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या उच्च माध्यमिक 12 वी परीक्षेतील
40% गुण विचारात घेऊन गुणवत्ता यादी तयार
करण्यात येणार असल्याचे केंद्र शासनाने व केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने
कळविलेले आहे. सदर बाब विचारात घेता मार्च 2011, ऑक्टो. 2011, मार्च 2012 च्या व
ऑक्टो 2012 च्या उच्च माध्यमिक (इ. 12 वी ) परीक्षेस एकाच वेळी सर्व
विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विदयार्थ्याना श्रेणी सुधारण्यासाठी फेब्रु / मार्च
2013 मध्ये घेण्यात येणा-या उच्च माध्यमिक परीक्षेस प्रविष्ठ होण्यास या योजनेतील
अटीस अधिन राहून अंतिम सेवा देण्यात येत आहे.
तरी अशा विदयार्थ्यांनी श्रेणी सुधार योजनेअंतर्गत परीक्षेस प्रविष्ठ
होण्यासाठी त्यांची आवेदपत्रे त्यांनी खालील निर्धारित कालावधित कनिष्ठ
महाविदयालयाकडे सादर करावीत. अ) अनियमित शुल्क नियमित विदयार्थ्यांच्या नियमित
शुल्काच्या दुप्पट , विदयार्थ्यांनी
कनिष्ठ महाविदयालयाकडे आवेदनपत्र
सादर करावयाची अंतिम दिनांक मंगळवार दि. 8 जानेवारी 2013 व कनिष्ठ महाविदयालयाने
विभागीय मंडळाकडे आवेदनपत्र सादर करावयाचा अंतिम दिनांक शनिवार दि. 12 जानेवारी
2013, ब) विलंब शुल्कासह नियमित विदयार्थ्यांच्या विलंब शुल्काच्या दुप्प्ट
विदयार्थ्यांनी कनिष्ठ महाविदयालयाकडे आवेदनपत्र सादर करावयाची अंतिम
दिनांक शनिवार दि. 12 जानेवारी 2013 व
कनिष्ठ महाविदयालयाने विभागीय
मंडळाकडे आवेदनपत्र सादर करावयाचा अंतिम दिनांक मंगळवार दि. 15 जानेवारी 2013
उपरोक्त कालावधीनंतर आलेली आवेदनपत्रे स्विकारली जाणार नाहीत, याची नोंद
घ्यावी तरी इच्छूक विदयाथ्यांनी त्यांच्या कनिष्ठ महाविदयालयाशी संपर्क साधून
श्रेणी सुधार योजनेची पूर्णत: माहिती घेऊन आवेदन पत्रे सादर करण्याची कार्यवाही
करावी. तसेच मार्च 2011, ऑक्टो 2011, मार्च 2012 व ऑक्टो 2012 उच्च माध्यमिक
प्रमाणपत्र (इ 12 वी ) परीक्षेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र जीवशास्त्र व गणित
(40 – कला व विज्ञान) या विषयाची जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा दयावी लागेल.
विदयार्थ्यांनी या विषयाची वेळापत्रक पाहून परीक्षेस प्रविष्ठ व्हावे. मात्र या
विदयार्थ्यांचे तोंडी / प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण व श्रेणी पुर्वीचीच ग्राहय
धरण्यात येईल.
यापुढे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) व माध्यमिक शालांत
प्रमाणपत्र (इ. 10 वी ) परीक्षेस एकाच
वेळी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विदयार्थ्यांना श्रेणी सुधारयोजने अंतर्गत
सलग दोन परीक्षेस (पुर्वीच्या एक ऐवजी) प्रविष्ठ होण्यास संधी देण्यात येत आहे.
मात्र अशा विदयार्थ्यांना तोंडी / प्रात्यक्षिक परीक्षेस प्रत्येक वेळी पुन्हा
नव्याने प्रविष्ठ व्हावे लागेल. असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण
मंडळ पुणे यांनी कळविलेले आहे.
No comments:
Post a Comment