जळगांव, दि. 13 :- परिवहन राज्यमंत्री तथा जळगांव जिल्हयाचे
पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांनी जळगांव बस स्टँड येथून सकाळी 8.40 वाजता
जळगांव ते जामनेर एस.टी.ने प्रवास करुन प्रवासांच्या समस्या जाणून घेतल्या.
या प्रवासा दरम्यान ना.
देवकर यांनी काही प्रवासी व विद्यार्थी यांच्याशी संवाद साधून प्रवाशांच्या एस.टी.
विषयी असलेल्या तक्रारी/सूचनांची माहिती घेतली. प्रवासी प्रमोद काळे यांनी जळगांव
ते जामनेर दरम्यान एस.टी.च्या फे-या वाढविण्याची मागणी केली. सकाळी 8.30 वाजता
जळगांव येथून तर जामनेर येथून सायंकाळी 5.30 वाजता गाडी सोडण्याची मागणी त्यांनी
यावेळी ना. देवकर यांचेकडे केली.
ना.
देवकर यांनी एस.टी. क्रमांक एम.एच-20 डी-9904 ने प्रवास केला. यावेळी त्यांनी
एस.टी.बसची पाहणी केली. सदरच्या बसमध्ये अस्वच्छता होती व मागील बाजूची सीट
फाटलेली असल्याचे निदर्शनास आले. बसमध्ये स्वच्छता व सीटची पाहणी करण्याची सूचना
ना. देवकर यांनी डेप्पो मॅनेजर पाटील यांना केली. तसेच जामनेर येथे बस
पोहोचल्यानंतर ना. देवकर यांनी जामनेर एस.टी.डेपोची पाहणी करुन डेपोमध्ये
स्वच्छाता ठेवण्याचे आदेश दिले.
राज्य
परिवहन विभागाच्या बसेस संबंधी प्रवासाच्या तक्रारी येत असतात. त्यामुळे सदरच्या
तक्रारी विषयी जाणून घेणे व एस.टी. मधील प्रवासी यांच्या समस्या ऐकून बस मधील
स्वच्छतेची व बसच्या स्थितीची पाहणी करणे हा जळगांव ते जामनेर बस प्रवासाचा उद्देश
असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी
जिल्हा सहकारी बँकेचे संचालक वाल्मिक पाटील, उपसभापती विजय नारखेडे, दिलीप धनगर
आदि सोबत होते.
No comments:
Post a Comment