नाशिक दि. 2: - महिला व बाल
विकास विभागाअंतर्गत महिला व बालकांच्या विकासासाठी विविध प्रकारच्या संस्थांतर्गत
व संस्थाबाह्य उपक्रम आणि सेवा पुरविण्यात येतात. स्त्री जन्माबाबतची उदासिनता कमी
करून स्त्री जन्माचे स्वागत करणे, मुलगा-मुलगी भेदभाव नष्ट करणे, हुंड्यासारख्या अनिष्ठ
प्रथा बंद करणे, स्त्रियांवर होणारे शारिरीक, मानसिक, आर्थिक, भावनिक, लैंगिक अत्याचार
होवू न देणे, बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी पालकांमध्ये आणि समाजात जागृती
निर्माण करणे तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या विविध
सेवा त्याचप्रमाणे केंद्र व राज्य शासनाच्या महिला व बाल विकासाच्या योजना समाजातील
तळागाळापर्यंत पोहचाव्यात आणि सदर योजना लोकाभिमुख
होवून अशा सेवांचा व योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील दुर्बल व गरजू घटक पुढे यावेत.
याबाबत
महिला व बालकांसाठी असणाऱ्या सामाजिक कायद्यांची माहिती प्रत्येक घरात पोहचविण्यासाठी
दि. 3 जानेवारी, 2013 ते 12 जानेवारी,
2013 या कालावधीत राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जाणीव-जागृती अभियान जिल्हा, प्रकल्प, व अंगणवाडी स्तरावर राबविण्यात
येत आहे. या अभियान कालावधीत चर्चासत्रे, पथनाट्य, रॅली, एकांकिका, स्पर्धा, प्रशिक्षण
शिबीर, कठपुतली शो यासारख्या कार्यक्रमांचा समावेश असणार आहे, असे विभागीय उपायुक्त,
महिला च बाल विकास विभाग, नाशिक विभाग, नाशिक यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment