Monday, 7 January 2013

युनिट हेडक्वार्टर कोटा सैन्य भरती 29 जानेवारी रोजी



          जळगांव, दि. 7 :- युनिट हेडक्वार्टर कोटा सैन्य भरती 1 एस. टी. सी. सेंटर जबलपुर ( I STC Jabalpur )  मध्ये शहिदांची विधवा, माजी सैनिक विधवा  व माजी सैनिक यांच्या पाल्यांकरीता सोल्जर जिडी व सोल्जर टेक्नीकल या पदांकरीता दिनांक 29 जानेवारी 2013 रोजी सैन्य भरती आयोजित करण्यात आलेली आहे. सदर सैन्य भरतीची चाचणी परिक्षा दिनांक 31 जानेवारी 2013 ते  04 फेब्रुवारी 2013 रोजी घेण्यात येणार आहे. तरी माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांनी याचा लाभ घ्यावा , असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment