Tuesday, 8 January 2013

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत अस्थीरोग वैद्यकीय तपासणी शिबीराचे आयोजन



           जळगांव, दि. 8 :- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगांव येथे रस्ता सुरक्षा अभियान 2013 कार्यक्रमाच्या सातव्या दिवशी दि. (7 जानेवारी रोजी ) दुपारी 12.00 वा. जळगांव जिल्हयातील सर्व वाहन मालक / चालक तसेच अनुज्ञप्तीधारक व इतर जनतेसाठी अस्थीरोग तपासणी शिबीर आयोजन श्री. मुंकूद गोसावी अध्यक्ष मुक्ती फाउडेंशन जळगांव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आले होते अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पी.डी. निकम यांनी दिली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. जे.जे. पवार सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी हे होते. सदर कार्यक्रमास श्री. विशाल घनवट, सहा. मोटार वाहन निरीक्षक हे उपस्थित होते.
           श्री. मुकूंद गोसावी, अध्यक्ष मुक्ती फाऊडेंशन, जळगांव यांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात रस्ता सुरक्षा सप्ताहमध्ये वाहन चालक / मालक व कार्यालयीन कर्मचारी यांना अस्थीरोग विषयी मार्गदर्शन केले अस्थीरोग तपासणी लाभ या कार्यालयातील कर्मचारी व वाहन मालक / चालक यांनी घेतला. कार्यक्रमास श्री. दिपक कदम,  श्री. मनोज सपकाळे, श्री. प्रविण येरा, श्री. विशाल पाटील, श्री. राजु देहाडे व कार्यालयीन कर्मचारी यांनी  सहकार्य केले.                                                             

No comments:

Post a Comment