चाळीसगांव दि.22:- तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी व फौजदारी न्यायालय,
वकील संघ चाळीसगांव व ग्रामपंचायत खरजई यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील मौजे
खरजई येथे शुक्रवार, दि. 25 जानेवारी,2013 रोजी सकाळी 09.00 वाजता ग्रामपंचायत आवारात
कौटुंबिक हिंसाचार, महिलांच्या हक्कांबाबत संरक्षणाचे कायदे, इतर महत्त्वाच्या विषयांवर
चर्चा व मार्गदर्शनविषयक शिबीराचे आयोजन करण्यांत
आले आहे.
या मार्गदर्शन शिबीराचा
अधिकाधीक जनतेने लाभ घ्यावा व आपली उपस्थिती नोंदवून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन
अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश क.स्तर, चाळीसगांव यांनी केले
आहे .
* * * * *
No comments:
Post a Comment