मुंबई,
दि. 18 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत सहायक संचालक (माहिती)/माहिती अधिकारी/अधिपरीक्षक,
पुस्तके व प्रकाशने गट-ब, उपसंपादक/माहिती सहायक, कनिष्ठ तांत्रिक सहायक, चित्रपट जोडणीकार,
वरिष्ठ दूरचित्रवाणी यांत्रिक, वाहनचालक, चित्रकार गट-क व शिपाई गट-ड या पदांसाठी दिनांक
9 डिसेंबर, 2012 रोजी मुंबईत लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत पात्र ठरलेल्या
उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 29 व 31 जानेवारी 2013 रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत.
दिनांक
29 जानेवारी, 2013 रोजी उपसंपादक/माहिती सहायक तर दिनांक 31 जानेवारी रोजी इतर संवर्गातील
पदांसाठी मुलाखती होणार आहेत. या मुलाखती चित्रपट परीक्षणगृह तळमजला, मंत्रालय, मुंबई
येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना मुलाखतीसाठी
पत्रे पाठविण्यात आली असून संबंधित याद्या व मुलाखत पत्रे http://mahapariksha.in/dgipr/ivletter/ivlist.asp
व http://mahanews.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध
करुन देण्यात आली आहेत.
एखाद्या
उमेदवारास मुलाखत पत्र प्राप्त झाले नाही तर त्याने वरील संकेतस्थळावरुन ते काढून घ्यावे
आणि मुलाखतीस उपस्थित रहावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात
येत आहे.
No comments:
Post a Comment