जळगांव. दि. 19 :- महाराष्ट्र
राज्य अल्पसंख्याक आयोगाकडून जिल्हास्तरावर देण्यात येणारा निधी यापुढे
जिल्हानिहाय लोकसंख्या विचारात घेऊन वितरीत करण्यात येईल अशी माहिती अल्पसंख्यांक
आयोगाचे अध्यक्ष मा. मुनाफ हकीम यांनी दिली.
अजिंठा शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत
श्री. हकीम बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी सोमनाथ गुंजाळ, अतिरिक्त
पोलिस अधिक्षक रुपसिंग तडवी, उपजिल्हाधिकारी साजीद पठाण, मनपा उपायुक्त भालचंद्र
बेहरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) शशिकांत हिंगोणेकर, मुख्याधिकारी प्रभाकर सोनवणे शिक्षणाधिकारी
(प्राथमिक) शिवाजी पाटील आदि उपस्थित होते.
श्री. हकीम पुढे म्हणाले, आयोगाकडून जिल्हास्तरांवर अल्पसंख्याक समाजाच्या
शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकासासाठी निधी देण्यात येतो. सदरचा निधी संबंधीत
विभागांकडे पोहोचल्यानंतर त्यांनी समाजासाठी महत्वाच्या असलेल्या कामांना
प्राधान्या दिले पाहिजे. तसेच
नगरपालिका क्षेत्रात अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी प्रत्येक प्रभागात निधी मिळाला
पाहिजे. पण त्यातून सदरची कामे पूर्ण झाली पाहिजेत. त्यानुसार निधी वाटप करण्याचा
संबधित अधिका-यांना अधिकार असल्याचे
त्यांनी सांगितले.
जिल्हयात उर्दू शाळांमध्ये 43 मराठी भाषेचा फौऊंडेशन कोर्स सुरु असून त्या
शिक्षकांचे अनुदान मिळाले नसल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली . सदरचे
अनुदान आयोगाकडून 31 जानेवारी पर्यंत मिळेल असे श्री. हकीम यांनी सांगितले.
तसेच डिसेंबर 2012 पर्यत अल्पसंख्यांक विदयार्थ्यांचे (1 ते 10 वी) 82 हजार
384 ऑन लाईन शिष्यवृत्ती अर्ज प्राप्त झालेले असून सदरच्या शिष्यवृत्तीस मंजूरी अदयापपर्यंत
मिळाली नसल्याची माहिती शिक्षणाधिकारी हिंगोणेकर यांनी दिली. तर शैक्षणिक पायाभूत
सुविधांसाठी प्राथमिक शाळांचे 30 तर माध्यमिकचे 76 प्रस्ताव असल्याची माहिती त्यांनी दिली.
उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षक भरती करार पध्दतीने करावी अशी सूचना
श्री. हकीम यांनी केली. त्यामुळे सदरच्या शाळांमधील विदयार्थ्यांचे शैक्षणिक
नुकसान होणार नाही.
यावेळी श्री. हकीम यांनी चोपडा व रावेर येथील दंगलीच्या कारणाबाबतचा व
त्यावर पोलिस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. तसेच रावेर,
चोपडा व जिल्हयात चालणारे सर्व बेकायदेशीर धंदे करणा-यावर कारवाई करण्याची सूचना
त्यांनी केली.
यावेळी शिक्षण (प्रा. / व मा.) पोलीस व नगरपालिका आदि विभागांचा आढावा
श्री. हकीम यांनी घेऊन अल्पसंख्याकांसाठी असलेल्या शासकीय योजना प्रभावीपणे
राबविण्याची सूचना केली.
No comments:
Post a Comment