Sunday, 6 January 2013

पाळधी येथील स्वच्छता मोहिमेची पालकमंत्र्यांकडून पाहणी

     जळगांव दिनांक 6:- पाळधी ता. धरणगांव गावांमधील स्वच्छता मोहिमेच्या कामाची पाहणी पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांनी आज सकाळी पाळधी गावाला भेट देऊन केली.
     यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे संचालक वाल्मिक पाटील, गट विकास अधिकारी ए.जी. तडवी आदिसह गावांमधील ग्रामस्थ उपस्थित होते.
     पाळधी बस स्थानक व दर्ग्यासमोरील नाला सफाईच्या कामाची ना. देवकर यांनी पाहणी करुन सदरच्या नाल्याची सफाई दोन-तीन दिवसात करुन गावांमध्ये स्वच्छता मोहिम राबविण्याची सूचना केली. तसेच गावांमध्ये स्वच्छता राहिल्यास साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सदरच्या स्वच्छता मोहिमेला पाळधी येथील ग्रामस्थांनी सहकार्य करावे व स्वत:ही स्वच्छता बाळगण्याचे आवाहन ना. देवकर यांनी यावेळी केले.

No comments:

Post a Comment