जळगांव, दि. 16 :- सर्वसामान्य लोकांना शासनाचे
निर्णय, योजना, उपक्रम यशोगाथा आदिंची माहिती मिळावी म्हणून लोकराज्य घरोघरी या
मोहिमेत सर्व शासकीय विभागातील अधिकारी , कर्मचारी यांनी सहभागी होऊन लोकराज्य
मासिकाचे वर्गणीदार व्हावे असे आवाहन
जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी आयोजित लोकराज्य मासिक वर्गणीदार होण्याबाबतच्या
बैठकीत जिल्हाधिकारी राजूरकर बोलत होते. यावेळी नाशिक विभागीय माहिती उपसंचालक
देवेंद्र भुजबळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एन. गायकवाड, उच्च शिक्षण विभागाचे
प्रशासन अधिकारी सुयश मोरे, पोलिस निरीक्षक योगेश मोरे, उप मुख्य कार्यकारी
अधिकारी (महिला व बालकल्याण) चे प्रतिनिधी, सहाययक प्रकल्प अधिकारी एस. पी.
अहिरराव आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राजूरकर म्हणाले, लोकराज्य मासिक हे अत्यंत उपयुक्त व वाचनीय
आहे. या मासिकात शासनाचे निर्णय, शासनाच्या विविध कल्याण्कारी योजनांची विविध
उपक्रमांची माहिती देण्यात येत असते.
त्यामुळे महाविदयालयीन विदयार्थी तसेच माध्यमिक शाळांमधील विदयार्थ्यांना हे मासिक
अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचे असल्याने शिक्षण विभागांनी सर्व शाळांना लोकराज्य
मासिकाची वर्गणी जिल्हा माहिती कार्यालयाकडे देण्याची सूचना त्यांनी केली.
तसेच जिल्हयातील सर्व शासकीय विभागातील अधिकारी / कर्मचारी यांनी सदरचे
मासिकाचे वर्गणीदार होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजूरकर यांनी केले.
यावेळी माहिती उपसंचालक देवेंद्र भुजबळ यांनी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर
राजूरकर यांना लोकराज्य मासिकाचा वसंतराव नाईक विशेषांक भेट म्हणून दिला. तसेच लोकराज्य
मासिकाचे महत्व सांगितले.
प्रारंभी माहिती अधिकारी श्री. सुनिल सोनटक्के यांनी उपस्थितांचे स्वागत
करुन बैठकीचे प्रयोजन विषद केले.
वर्गणी भरण्याचा पत्ता – जिल्हा
माहिती अधिकारी,
जिल्हा माहिती कार्यालय,
मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पहिला मजला,
आकाशवाणी केंद्राजवळ, जळगांव.
दूरध्वनी क्रमांक :- 0257 - 2229628
फॅक्स क्रमांक :- 0257
- 2221078
No comments:
Post a Comment