जळगांव,
दि. 7 :- चोपडा शहरातील नगर वाचन मंदिरास 125 वर्षे पूर्ण झालेली असून सदरच्या
वाचनालयाचा शतकोत्तर रौप्य महोत्सव समारंभाचे उदघाटन नियोजन आयोगाचे सदस्य डॉ.
नरेद्र जाधव यांचे हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी
विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, आमदार गिरीष बापट, आमदार जगदीश वळवी, चोपडा
नगराध्यक्ष ॲड. संदीप पाटील, सौ. सुशिलाबेन शहा आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. नरेंद्र जाधव यांनी “माझे
लेखन “ या विषयावर आपले मनोगत
व्यक्त केले. विशेषत: डॉ. आंबेडकर, रविंद्र टागोर व “आमचा बाप आणि आम्ही ” या लेखन साहित्या विषयी डॉ. जाधव यांनी
श्रोत्यांना माहिती सांगितली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणामध्ये
तत्कालीन विचारवंतापैकी खूप अधिक विविधता होती. तसेच डॉ. आंबेडकरांनी राजकीय,
सामाजिक, धार्मिक, आर्थिक, कायदा, आदि विषयांवर मार्गदर्शन व लेखन केलेले असल्याचे
डॉ. जाधव यांनी सांगितले. त्याप्रमाणेच रविंद्र टागोर यांनी महाराष्ट्राच्या
संस्कृतीशी निगडीत भरपूर कविता लिहिलेल्या असून शिवाजी महाराज यांच्यावरील कविता
वाचनीय असल्याची माहिती डॉ.जाधव यांनी दिली.
डॉ. जाधव यांनी “आमचा बाप आणि आम्ही “ या पुस्तकाविषयी खूप माहिती देऊन त्यांच्या
वडिलांच्या आठवणी सांगितल्या. तसेच “आमचा बाप आणि आम्ही” या पुस्तिकेची 161 वी आवृत्ती लवकरच प्रसिध्द
होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रारंभी डॉ. जाधव यांनी नगर वाचन
मंदिरात दीपप्रज्वलन व सरस्वतीपूजन करुन शतकोत्तर रौप्य महोत्साचे उदघाटन केले.
यावेळी डॉ. जाधव यांच्या हस्ते स्मरणीकेचे प्रकाशन करण्यात आले तर लेखिका
पौर्णिमाबेन हुंडेवाली लिखित तीन पुस्तिकांचे प्रकाशनही डॉ. जाधव व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोविंदभाई
गुजराथी यांनी केले. चोपडा नगर परिषद व आमदार जगदीश वळवी यांनी सदरच्या वाचनालयाला
वेळोवेळी आर्थिक मदत केली असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
पौणिमाबेन हुंडीवाले यांनी केले तर आभार प्रदीप जैन यांनी मानले.
No comments:
Post a Comment