मुंबई, दि.2 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अधिनियम,
2010 मध्ये सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (सुधारणा)
अधिनियम 2012 प्रकाशित करण्यात आला आहे. राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर
महाराष्ट्र शासन राजपत्रात 24 डिसेंबर 2012 रोजी हा अधिनियम प्रथम प्रकाशित
करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अधिनियम, 2010 या मुख्य
अधिनियमाच्या कलम 3 मधील पोटकलम (3) मध्ये
‘अपर महासंचालक’ या
मजकुरापूर्वी ‘महासंचालक व महानिरीक्षक किंवा’ हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल आणि तो दिनांक 23 ऑगस्ट 2012 पासून
समाविष्ट करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल.
मुख्य अधिनियमाच्या कलम 9 मधील पोट कलम (2) मध्ये ‘महासंचालक व महानिरीक्षक’ या मजकुराऐवजी ‘पोलीस महासंचालक व महानिरीक्षक हा मजकूर दाखल करण्यात येईल.
मुख्य अधिनियमाच्या कलम 13 मधील पोट कलम (2) मध्ये ‘महासंचालक व महानिरीक्षक’ या मजकुराऐवजी ‘पोलीस महासंचालक व महानिरीक्षक हा मजकूर दाखल करण्यात येईल.
No comments:
Post a Comment