Friday, 7 September 2012

अपूर्ण पाणी पुरवठा योजनांची सुनावणी सीईओ ने घेऊन योजना मार्गी लावाव्यात : पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर

जळगांव,दिनांक 7:-जिल्हायातील ज्या गावांच्या पाणी पुरवठा योजना तीन वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून रखडलेल्या आहेत,अशा गावांच्या पाणी पुरवठा समित्यांची सुनावणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घ्यावी व सदरची योजना पूर्ण न करणाऱ्या समित्यांकडून काम काढून जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने योजना पूर्ण करण्याची सूचना पालकमंत्री ना.गुलाबराव देवकर यांनी आज सकाळी अल्पबचत भवनात आयोजित पाणी पुरवठा आढावा बैठकीत दिली.
            प्रारंभी ग्रामीण पाणी पुरवठा योजना ( जि.प.) चे कार्यकारी अभियंता श्री. ठाकूर यांनी सन 2012-13 मध्ये 385 पाणी पुरवठा योजनांची कामे रखडल्याची माहिती दिली. यात जिल्हा परिषदेच्या 280 योजना तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या 105 योजना आहेत.  तसेच 305 पाणी योजनांची कामे प्रगती पथावर असून त्या योजना लवकरच मार्गी लागतील असे त्यांनी सांगितले. रखडलेल्या 385 योजनांवर 165.64 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे श्री. ठाकूर यांनी सांगितले.
            ना. देवकर यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हयातील ग्रामीण पाणी पुरवठा योजनाबाबत तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. यात अंमळनेर-3, पारोळा-5, भुसावळ -2, चोपडा-1, धरणगांव-6, जळगांव-3, मुक्ताईनगर-4, एरंडोल -11,रावेर-2, जामनेर-3 आदि तालुक्यांमधील पाणी पुरवठा योजना रखडलेल्या आहेत. अशी माहिती पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली.
            सदरच्या गावांमधील गाव पाणी पुरवठा समित्या काम करत नाहीत.  निधी उचलतात व अपहार करुन कामे अपूर्ण ठेवतात.  त्यामुळे योजनेचे पुन्हा रिवाईज इस्टीमेट बनवून योजनेचा खर्च वाढतो.  त्यामुळे शासनाचा पैसा वाया जातो. हे सर्व थांबण्यासाठी सदरच्या समित्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी बैठकीस उपस्थित सर्व  लोकप्रतिनीधींनी केली ना. देवकर यांनी प्रशासनाने सदरच्या समित्यांना नोटिसा बजावून त्यांच्यावर एफआयआर दाखल करावे . तसेच प्रथम जि.प. सीईओकडे त्यांसंबंधी सुनावणी होऊन त्यातून अंतीम निर्णय घ्यावा व सदरची योजना मार्गी लावण्याचे आदेश दिले.
            या बैठकीस जि.प. अध्यक्ष दिलीप खोडपे, आमदार सर्वश्री साहेबराव पाटील, राजीव देखमुख, दिलीप वाघ, संजय सावकारे, जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, सीईओ श्रीमती शितल उगले, विषय समिती सभापती, सर्व गट विकास अधिकारी व पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता आदि उपस्थित होते.

* * * * * * * * * * 
²ÖÖŸÖ´Öß ÜÖÖ¡Öß“Öß ... ´ÖÖׯüŸÖß ¯ÖÏÝÖŸÖß“Öß...¾Öê¬Ö ³Ö×¾ÖµÖÖ“ÖÖ....

No comments:

Post a Comment