Tuesday, 11 September 2012

बागायती कापुस लागवडीच्या सदयस्थितीतील समस्येवरील उपाययोजना


          जळगांव, दि. 11 – बागायती कापुस पिकांवर सदया काही झाडांची पाने सुरवातीला पिवळसर पडलेली असुन नंतर संपुर्ण पाने, खोडे, लाल होउन पाने जाडसर होतात. मुळांची वाढ समाधानकारक होत नाही. झाडांची वाढ थांबते आकस्मित मर होते. अशा प्रकारची लक्षणे दिसतात. प्रामुख्याने कापसाच्या झाडाच्या शरीर क्रियेतील असंतुलनामुळे अशी लक्षणे दिसतात. अशावेळी वाढ खुंटलेली झाडे उपाययोजना केल्यानंतर सुध्दा प्रतिसाद देत नाही यासाठी 1.5 टक्के युरीया अधिक 1.5 टक्के म्युरेट ऑफ पोटॅशचे द्रावण करुन हया द्रावणाची प्रति झाडास 150 ते 200 मिली. आळवणी (ड्रेंन्चीगं) करावे व पिकाला पाणी दयावे. त्यानंतर पिकाला 2 टक्के ड्राय अमोनिअम फॉस्फेटच्या द्रावणाची आळवणी (ड्रेंन्चीगं) करावे व पिकाला पाणी दयावे. ताण पडु न देता कायम वाफसा स्थितीत पिक राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच मर रोगाचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास 15 लिटर पाण्यात 75 ग्रॅम कॉपर ऑक्झी क्लोराईड किंवा 30 ग्रॅम कार्बेनेझिम बुरशीनाशक देऊन प्रति झाडाला बुंध्याभोवती 150 ते 200 मिली द्रावणाची आळवणी करावी.

No comments:

Post a Comment