Tuesday, 18 September 2012

महाराष्ट्राच्या परंपरेला साजेशा वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा : मुख्यमंत्री



जनसंपर्क कक्ष / मुख्यमंत्री सचिवालय 
मुंबई, दि. 18 सप्टेंबर : महाराष्ट्राचे खास वैशिष्ट्य असलेला गणेशोत्सव शांततेत आणि परंपरेला साजेशा वातावरणात साजरा करावा असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.
गणेशोत्सवानिमित्त राज्यातील जनतेला दिलेल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात की, लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या या उत्सवाचे महत्व आज बदलत्या काळात आणि परिस्थितीतही टिकून आहे. सुरक्षाविषयक सर्व प्रकारची काळजी घेऊन, ध्वनीप्रदूषणविषयक सर्व कायदे काटेकोरपणे पाळून हा गणेशोत्सव पर्यावरणपूरक वातावरणात साजरा केल्यास उत्सवाचा आनंद सर्वांना घेता येईल असेही मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात.

No comments:

Post a Comment