जळगांव, दि. 26 :- जळगांव जिल्हयातील निम्न तापी
पाडळसे धरण या महामंडळातर्गत आहे. या बाबत सन 2001 मध्ये कार्यकारी अभियंता,
गुणनियंत्रण विभाग, धुळे येथे श्री.व्ही.बी.पांढरे कार्यरत असतांना या प्रकल्पाचे
गुणनियंत्रण त्यांचे विभागाकडे होते. त्यावेळी त्यांनी सदर प्रकल्पांच्या झालेल्या
बांधकामाच्या गुणवत्ते बाबत काही मुददेउपस्थित करुन शासनास अहवाल सादर केला होता.
सदर
प्रकल्पाच्या बांधकामाच्या नमुन्यांच्या गुणवत्ता चाचण्या वेळोवेळी घेण्यात
आलेल्या आहेत. सदर चाचण्याचे निष्कर्षावरुन सदर काम धरणाच्या निविदेतील
विनिर्देशानुसार घेतल्या जात असून अपेक्षीत दर्जाच्या गुणवत्तेनुसार आहेत. सदय:स्थितीत
निम्न तापी धरणाचे काम सुमारे 22% पूर्ण झाले आहे. आज रोजी धरणात 68.15 दलघफू
पाणीसाठा आहे. या धरणावरुन सन – 2001 पासून सन 2012 पर्यंत सर्वात जास्त म्हणजे 11
लक्ष घनफुट प्रती सेंकद एवढा पूर सन – 2006 मध्ये गेलेला आहे. त्यामुळे सदर धरणाचे
कोणतेही नुकसान झालेले नाही. सदर धरण फुटण्याचा व त्या खालील बाजूस असलेली 3 धरणे
फुटण्याचा व गावांना धोका असल्याचे म्हणणे चुकीचे आहे, हे निदर्शनास येते असे
अधीक्षक अभियंता जळगांव पाटबंधारे प्रकल्प मंडळ, जळगांव यांनी एका पत्राकाव्दारे
कळविले आहे.
No comments:
Post a Comment