Saturday, 1 September 2012

तेलबिया संशोधन केंद्राच्या बळकटी करणासाठी पाच कोटी मंजूर : पालकमंत्री ना.देवकर

जळगांव, दि. 1 :- महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत असलेल्या जळगांव येथील तेलबिया संशोधन केंद्राच्या बळकटी करणासाठी 5 कोटी रुपये अनुदान मंजूर करण्यात आले असून 2 कोटी  50 लाख रुपयांचा निधी प्रत्यक्ष उपलब्ध झाला असून बळकटीकरणाच्या कामांना सुरुवात झालेली आहे. अशी माहिती राज्याचे कृषि राज्यमंत्री तथा जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री  ना. गुलाबराव देवकर यांनी आज येथे दिली आज सकाळी  देवकर यांनी तेलबिया संशोधन केंद्रास भेट देवून बळकटीकरणांतर्गत सुरु करण्यात आलेल्या विविध कामांची पहाणी केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा बॅकेचे संचालक वाल्मिक पाटील, ``आत्माचे`` प्रा. एन डी पाटील, विलास पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
            यावेळी बोलतांना ना. देवकर म्हणाले, तेलबियांचे उत्पादन वाढीसाठी शास्त्रज्ञांनी विकसीत केलेले नवनवीन वाण आणि तंत्रज्ञान शेतक-यांच्या बांधापर्यंत पोहचविण्यास कृषि विभागाने प्रयत्न करावा शास्त्रज्ञांनी नवनवीन वाण विकसीत करुन कमी पाण्यावर जादा उत्पन्न देणारे वाण विकसीत करुन या केंद्राचा नावलौकीक वाढवून गत 99 वर्षात पुरेसे आर्थिक अनुदान न मिळाल्याने हाती न घेवू शकलेले उपक्रम भविष्यात हाती घ्यावयाचे उपक्रम याचा आराखडा तयार करुन केंद्राच्या शतक महोत्सवी वर्षात पुरेसे अनुदान मागणी करावी. केंद्राचे बळकटीकरणाने शेतक-यांची आर्थिक उन्नत्ती साधली जाणार आहे. संशोधन केंद्रास पुरेसे अनुदान उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाकडे आपण आग्रही राहू असे त्यांनी सांगितले.
            प्रारंभी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ सुदाम पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले प्रास्ताविकात तेलबिया संशोधन केंद्रास आतापर्यंत एवढे आर्थिक अनुदान मिळाले नव्हते राज्याचे कृषि राज्यमंत्री तथा जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी सातत्याने पाठपुरावा करुन रुपये 5 कोटी अनुदान मिळवून दिले आहे 5 कोटी अनुदानातून पहिला 2 कोटी 50 लाखाचा  हप्ता मिळालेला असून केंद्राची संरक्षण भित्त प्रयोगशाळा अंतर्गत रस्ते आदि कामे हाती घेण्यात आलेली आहेत. हाती घ्यावयाच्या कामांचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. ना. देवकर यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात जावून संशोधन कार्य, पायाभूत सुविधा विविध तेलबियांचे प्लॉटची पहाणी केली.
            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी केले तर केळी संशोधन केंद्राचे प्रमुख प्रा. शेख यांनी आभार प्रदर्शन केले 
                                                                        * * * * * *

No comments:

Post a Comment