चाळीसगांव दि.8 :- मातृभुमीच्या रक्षणार्थ स्वत:च्या प्राणाचे बलीदान करणा-या खेडगांव येथील विर जवान अमोल साळुंखे याच्या स्मृती चिरंतर जागृत राहण्यासाठी खेडगांव तालुका चाळीसगांव येथे शहिद स्मारक उभारण्यात आले त्याचे अनावरण जिल्हयाचे पालकमंत्री तथा परिवहन, कृषि राज्यमंत्री ना.गुलाबराव देवकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आपल्या भाषणात बोलतांना ना.देवकर म्हणाले की, शहिद स्मारक हे भावी पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरेल मातृभुमीच्या रक्षणासाठी खान्देशातून मोठया प्रमाणावर तरुण वर्ग सैन्य दलात भरती होत आहे याचा अभिमान बाळगुन त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शहिद जवान स्मारकाचा सोहळा हा úकÖîतुकास्पद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या वेळी माजी परिवहन मंत्री सतिष पाटील, आमदार राजीव देशमुख, स्टेट मार्केट फेडरेशन चे अध्यक्ष रविंद्र पाटील, शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दिलीप सोनवणे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत विर माता पिता तसेच विर पत्नींचा सत्कार करण्यात आला. खेडगांव येथील अमोल साळुंखे हा जवान दिनांक 20 जानेवारी, 2004 मध्ये सैन्य दलात भरती होऊन बेळगांव येथे जवान पदाचे प्रशिक्षण पुर्ण केले त्यानंतर जम्मु कश्मिर येथे 2 वर्षे आपले कर्तव्य बजावून सिक्कीम बॉर्डर येथे विशेष पथकात त्याची नेमणुक करण्यात आली होती. सिक्कीम बॉर्डर येथील ऑपरेशन फल्कर मधील जबाबदारी पार पाडतांना अमोल साळुंखे यांना दिनांक 22 ऑगस्ट, 2007 रोजी वीर गती प्राप्त झाली. अशा विर जवानाच्या आठवणींना प्रास्ताविकात उजाळा देत असतांना विर माता व पित्याने आपल्या अश्रुंना वाट मोकळी केल्याने सर्व परिसरात भावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
चाळीसगांव तालुक्यातील खेडगांव व खेडी येथील सर्व जाती धर्माचे लोकांचा एकजुटीचा वारसा या गावाने कायम ठेवला याचा आपल्याला अभिमान वाटतो असे उद्गार माजी परिवहन मंत्री सतिष पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले. खेडगांव तसेच परिसरात विविध विकास कामे पुर्ण करण्यासाठी या एकजुटीचा उपयोग नक्कीच झाला असून यापुढेही हा वारसा अबाधित ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमात आमंत्रीत माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे, आमदार राजीव देशमुख, मार्केट फेडरेशनचे अध्यक्ष रविंद्र पाटील, यांनी मार्गदर्शनपर आपले विचार मांडले.
या
कार्यक्रमासोबत परिसरातील विविध विकास कामांचे भुमिपूजनही जिल्हयाचे पालकमंत्री ना.गुलाबराव देवकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार कार्यक्रमाचे आयोजक शशीकांत साळुंखे यांनी केले या कार्यक्रमास सरपंच अलकाबाई साळुंखे, उपसरपंच विमलबाई माळी, खेडी सरपंच निर्मलाबाई पाटील, खेडी उपसरपंच उत्तम महाजन, महानंद चे संचालक प्रमोद पाटील, विनोद तराळ, विकास पाटील, विनोद देशमुख, अस्मीता पाटील, छाया महाले, कस्तुराबाई महाजन, रमेश अहिरराव, वि.का.सो.चे अविनाश “ÖÖî¬Ö¸üß ग्रा.पं.सदस्य यांच्यासह मोठया प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.
*
* * * *
No comments:
Post a Comment