Monday, 17 September 2012

जिल्हयातील सहकार क्षेत्राची परिस्थिती वाईट .. पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर


              जळगांव, दिनांक 17 :- जिल्हयातील सहकार क्षेत्राची परिस्थिती वाईट असून अनेक सहकारी संस्था बंद पडत आहेत.  त्यामुळे सहकारी संस्था व्यवस्थापन व सभा कामकाज ही पुस्तिका जिल्हा उपनिंबधक कार्यालयाच्या माध्यमातून जिल्हयातील सर्व सहकारी संस्थापर्यत पोहोचविण्यात यावी, असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांनी केले.  ते आज सकाळी जळगांव जिल्हा बोर्ड व्दारे आयोजित कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
            यावेळी जि.प. अध्यक्ष दिलीप खोडपे,  जिल्हा बॅकेचे संचालक वाल्मीक पाटील, नानासाहेब देशमुख, अण्णासाहेब बापूराव हिंमतराव पवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष उदयसिंग पवार, प्रादेशिक सहकारी मंडळाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख , प्रतापराव पाटील, आदि उपस्थित होते.
            प्रारंभी ना. देवकर यांचे हस्ते जिल्हयातील सहकार क्षेत्रात अव्दितीय कामगिरी करणारे व वयाच्या 82 व्या वर्षात पदार्पण करणारे अण्णासाहेब बापूराव हिंमतराव पवार यांचा पुष्पगुच्छ , शाल, श्रीफळ, देऊन सत्कार करण्यात आला. तसेच श्री. पवार यांना ना. देवकर यांचे हस्ते कृषि मित्र पुरस्कार व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
            सहकार क्षेत्रासंबंधी 97 वी घटनादुरुस्ती करण्यात आली. त्या अनुषंगाने सहकार चळवळीत लोकांना व संस्थांना मार्गदर्शनपर ठरेल अशी सहकारी संस्था व्यवस्थापन व सभा कामकाज हया श्री. पवार यांनी लिहिलेल्या पुस्तिकेचे विमोचन ना. देवकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
            सदरची पुस्तिका ही जिल्हयाच्या सहकार क्षेत्रातील सर्व संस्था, कर्मचारी, अधिकारी व पदाधिकाऱ्यांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल. त्याकरिता ही पुस्तिका त्यांच्यापर्यत पोहोचविण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाची मदत घ्यावी असे      मा. देवकर यांनी सांगितले. तसेच अण्णासाहेबांचे सहकार क्षेत्रातील कामगिरी उत्कृष्ट असून त्यांना शतायुष लाभेल अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
            यावेळी सहकारातून नागरी व ग्रामीण भागाचा विकास या विषयावर आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.  प्रथम व्दितीय , तृतीय पुरस्कार प्राप्त विद्यार्थी अनुक्रमे कु. रोहिणी प्रमोद भासंगे, कु. आरती राजेंद्र बडगुजर, कु. प्रेरणा देशमुख आदि.
            कार्यशाळेचा प्रारंभ ना. देवकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन झाला, कार्यक्रमाचे प्रास्ताविक अण्णासाहेब बापूराव पवार यांनी केले.

No comments:

Post a Comment