जळगांव, दि. 12 – रावेर व भडगांव तालुक्यातील
सर्व माजी सैनिक / विधवा व त्यांचे
अवलंबितांच्या अडीअडचणी सोडविण्याकरिता खालील प्रमाणे गठीत केलेल्या समितीची बैठक
संबंधित तहसिलदार यांचे अध्यक्षतेखाली समितीची
बैठक आयोजित केलेली आहे. तरी संबंधित तालुक्यातील माजी सैनिक / अवलंबितांनी
त्यांच्या अडीअडचणी असल्यास लेखी स्वरुपात दोन प्रतीत आणाव्या व बैठकीस हजर राहून
आपले प्रकरण संबंधित तहसिलदारांना पुढील 20 सप्टेंबर 2012 रोजी रावेर येथे 11.30 वा. तर 25 सप्टेंबर 2012 रोजी भडगांव येथे 11.30 वा. उचित
कार्यावाहीसाठी सादर करावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगांव यांनी एका
प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
0 0 0 0 0
No comments:
Post a Comment