मुंबई, दि. 6 :
महाराष्ट्र शासनाच्या एतदर्थ मंडळामार्फत शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ऑक्टोबर - नोव्हेंबर 2012 मध्ये घेण्यात येणाऱ्या टंकलेखन व लघुलेखन परीक्षा 30
ऑक्टोबर व 22 नोव्हेंबर 2012 रोजी होणार आहे. त्या करिता मराठी लघुलेखन
परीक्षेसाठीची आवेदनपत्रे 1 ऑक्टोबर 2012
पर्यंत तर मराठी टंकलेखन परीक्षेसाठी 8 ऑक्टोबर 2012 पर्यंत भाषा संचालनालयाच्या
अंतर्गत असलेल्या (नवी मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद) विभागीय कार्यालयाकडे
पोहचणे आवश्यक आहे.
ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांनी
त्यांची विहित नमुन्यातील आवेदनपत्रे दोन्ही परीक्षांसाठी स्वतंत्र्यरित्या
आपापल्या कार्यालय प्रमुखांमार्फत भाषा संचालनालयाच्या अंतर्गत असलेल्या (नवी
मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद) विभागीय कार्यालयाकडे पाठवावयाचे आहेत. या
आवेदनपत्रात उमेदवारांचे संपूर्ण नाव, कार्यालयाचा पत्रव्यवहाराचा पूर्ण पत्ता पिन
कोड क्रंमाकासह नमूद करणे आवश्यक आहे. परीक्षेचे आवेदनपत्रे भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयाकडे
परस्पर पाठवू नयेत.
एतदर्थ मंडळाची 80
शब्द प्रति मिनिट गती मराठी लघुलेखन परीक्षा 30 ऑक्टोबर 2012 रोजी होणार असून ही
परीक्षा इंग्रजी लघुलेखक (निवड श्रेणी, उच्च श्रेणी, निम्न श्रेणी) व इंग्रजी लघु
टंकलेखक यांच्यासाठी मंगळवार, दि.30
ऑक्टोबर2012 रोजी मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद या चार विभागीय ठिकाणी घेण्यात
येईल मात्र एखाद्या केंद्रावर 10 पेक्षा कमी उमेदवार असल्यास त्या ठिकाणी केंद्र
केले जाणार नाही.
एतदर्थ मंडळ मराठी
टंकलेखन परीक्षा दि.22 नोव्हेंबर,2012 (30 शब्द प्रति मिनिट गती) ही परीक्षा
इंग्रजी टंकलेखनाचे काम करणारे टंकलेखक व लिपिक-टंकलेखक तसेच इंग्रजी लघुलेखक,
इंग्रजी लघुटंकलेखक यांच्यासाठी गुरुवार, दि.22.11.2012 रोजी सर्व मुंबई, ठाणे,
पुणे, नागपूर व औरंगाबाद या ठिकाणी घेण्यात येईल मात्र एखाद्या केंद्रावर 10
पेक्षा कमी उमेदवार बसणार असतील त्या ठिकाणी केंद्र न करता नजीकच्या केंद्रावर
त्यांची व्यवस्था करण्यात येईल. मराठी टंकलेखन परीक्षा संगनकावर घेण्यात
येणार असून ती 30 श.प्र.मि.गतीची असेल.
यासाठी आय.एस.एम.(ISM)सॉफ्टवेअरमध्ये DVB-TT Surekha हा फाँट टंकलेखनासाठी
वापरणे आवश्यक राहील. संगणकाची व्यवस्था
परीक्षा केंद्रावर मंडळामार्फत करण्यात येणार आहे.
तरी
इच्छुकांनी पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावेत
- कोकण विभाग- भाषा अधिकारी, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, कोकण भवन, 3रा मजला, नवी मुंबई 400614, दूरध्वनी क्र. 022-27573542; पुणे व नाशिक विभाग- विभागीय सहायक
भाषा संचालक, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय,नवी मध्यवर्ती इमारत, 2रा मजला पुणे 411001, दूरध्वनी क्र.020-26121709.; नागपूर व अमरावती विभाग- विभागीय सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, प्रशासकीय इमारत, 2रा मजला, सिव्हिल लाईन्स, नागपूर 440001, दूरध्वनी क्र. 0712- 2564956; औरंगाबाद विभाग- विभागीय सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, जुने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर, औरंगाबाद 431001, दूरध्वनी क्र. 0240- 2361372.
0 0 0 0 0
No comments:
Post a Comment