Wednesday, 19 September 2012

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांसाठी सप्टेंबर 2012 महिन्याचे अन्नधान्य परिमाण

      मुंबई, दि. 19 : मुंबई व ठाणेशिधावाटप क्षेत्रातीलसार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत कौटुंबिक शिधापत्रिकेवर माहे सप्टेंबर 2012 साठीचे अन्नधान्य परिमाण पुढीलप्रमाणे आहे.
        ए. पी.एल. शिधापत्रिकाधारकास एकूण 15 किलो धान्य वितरीत करण्यात येणार आहे. यामध्ये 5 किलोतांदूळ 9.60 रुपयेप्रती किलो दराने व 10 किलो गहू 7.20रुपये प्रती किलो दराने मिळणारआहे.
        शिधापत्रिकाधारकास फक्त गहूहवा असल्यास त्यांना तो 15 किलोपर्यंत घेता येणार आहे.
        बी. पी. एल शिधापत्रिकाधारकास एकूण 35 किलो धान्यदेण्यात येणार असून त्यात 25 किलो तांदूळ 6 रुपयेप्रतिकिलो व 10 किलोगहू 5 रुपयेप्रतिकिलो दराने उपलब्ध होणार आहे.
        सदर शिधापत्रिकाधारकांना जर बी.पी. एल.दराचे 35 किलोधान्य महिन्यामध्ये एकाचवेळी उचलणे शक्य नसल्यास त्यांना ते धान्य दोनटप्प्यांमध्ये घेता येणार आहे. वरील परिमाणाव्यतिरिक्त या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिमहाप्रतिशिधापत्रिका 5 किलो धान्य त्यापैकी 1 किलो तांदूळ व 4 किलो गहू यापरिमाणानुसार तांदूळ रु 6 प्रतिकिलो व गहू रु 5 प्रतिकिलो, दराने अतिरिक्तनियतनाचे वितरण करण्यात येईल, असे नियमित व अतिरिक्त असे एकूण (35+5)= 40 किलोधान्य वितरीत करण्यात येईल. .
        अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी असे शिक्के मारलेल्याप्रत्येक शिधापत्रिकेवर एकूण 35 किलो धान्य देण्यात येणार आहे. त्यापैकी 25 किलो तांदूळ 3 रुप्रतिकिलो व 10 किलो गहू 2 रु प्रतिकिलो दराने आहे.अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका नियमित धान्य 35 किलो असूनसदर धान्य दोन टप्प्यात अथवा एकाटप्प्यात उचलता येणार आहे.  वरील परिमाणाव्यतिरिक्तप्रतिमाह प्रती शिधापत्रिका 5 किलो धान्य त्यापैकी 1 किलो तांदूळ व 4 किलो गहू यापरिमाणानुसार तांदूळ रु. 6 प्रतिकिलो व गहू रु. 5 प्रतिकिलो, असे अतिरिक्त धान्यबीपीएल दराने या योजनेच्या लाभार्थ्यांना नियमित धान्य, अंत्योदय दराने व अतिरिक्तधान्य बी. पी. एल. दराने असे एकूण (35+5)= 40 किलो धान्य वितरीत करण्यात येईल.
        केंद्रीय अन्नपूर्णा योजनेंतर्गत 65 वर्षावरील निराधार व्यक्तींना 5 किलोगहू मिळणार आहे. हे धान्यसंपूर्णत: मोफत आहे.
        दारिद्रय रेषेखालील पिवळयाशिधापत्रिकाधारकांसाठी माहे सप्टेंबर 2012 करिता दर माणसी 500 ग्रॅमसाखर 13.50 रुपये प्रती किलो दराने मिळणार आहे. ज्यापिवळया शिधापत्रिकाधारकांना माहे ऑगस्ट 2012 चा साखरेचा कोटा मिळाला नसेलत्यांना तो कोटा माहे सप्टेंबर 2012 मध्ये घेता येणार आहे.
        तसेच केरोसिनच्या बाबतीत एक गॅसधारक शिधापत्रिकासाठी 2 लिटर व बिगर गॅस धारकशिधापत्रिकाधारकासाठी एक व्यक्तीसाठी 2 लिटर,2 व्यक्तीसाठी5 लिटर, 3 व्यक्तीसाठी 6 लिटर, 4 व्यक्तीसाठी7 लिटर, 5 व्यक्तीसाठी 8 लिटर, 6 व्यक्तीसाठी 9 लिटर तसेच 7 वत्यावरील व्यक्तीसाठी 10 लिटर केरोसीन मुंबईविभागासाठी 14 रुपये 44 पैसे दराने वठाणे विभागासाठी 14.50 रुपये ते 14.69 रुपयेप्रतिलिटर असा दर निश्चित करण्यात आला आहे, असे नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment