मुंबई, दि. 14 :
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत राज्यातील टंचाई परिस्थिती निवारणार्थ 100 टक्के
अनुदानावर 'चारा टंचाई निवारणार्थ गतिमान वैरण विकास कार्यक्रम'- 30.72 कोटी
रुपये, 'महात्मा फुले जलभूमी अभियान'- 25कोटी रुपये, 'सिमेंट चेक डॅम बांधण्याचा
कार्यक्रम'-25.06 कोटी रुपये या तीन योजना सन 2012-13 मध्ये राबविण्यासाठी एकूण
80.78 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
चारा टंचाई निवारणार्थ
गतिमान वैरण विकास कार्यक्रमासाठी संचालक (विस्तार व प्रशिक्षण ) कृषी आयुक्तालय,
पुणे; महात्मा फुले जलभूमी अभियान तसेच सिमेंट चेक डॅम बांधण्याचा कार्यक्रमाच्या
अंमलबजावणीसाठी संचालक मृद संधारण व
पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, कृषी आयुक्तालय, पुणे यांना नियुक्त करण्यात आले.
*****
गांडूळ
व जैव खताचे उत्पादन व वापर योजनेसाठी
70 लाख
रुपये निधी मंजूर
मुंबई, दि. 14 : कृती
आराखड्यांतर्गत सन 2012-13 या वर्षासाठी खताचा समतोल व एकात्मिक वापर अंतर्गत
गांडूळ व जैव खताचे उत्पादन व वापर ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यात
राबविण्यासाठी केंद्राचा 174 लाख रुपये व राज्य शासनाचा 46 लाख रुपयांचा हिस्सा
याप्रमाणे एकूण 220 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या मंजूर करण्यात आलेल्या
रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून 70 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यास शासनाने वित्तीय
मान्यता दिली आहे. या रकमेत केंद्र शासनाचा 52.50 लाख व राज्य शासनाचा 17.50 लाख
रुपये इतका हिस्सा आहे.
कृति आराखड्यांतर्गत
खताचा समतोल व एकात्मिक वापर, अंतर्गत गांडूळ खताचे उत्पादन व वापर बायोडायनामिक
कंपोस्ट डेपो उभारणी, सेंद्रीय शेती प्रमाणिकरण व हिरवळीचे खत वापरुन जमिनीचे
आरोग्य सुधारणे हे घटक राबविण्यात येत आहेत.
*****
No comments:
Post a Comment